• Download App
    तालिबानी सत्तेला मान्यता देण्याची कोणत्याच देशाला नाही घाई, अमेरिकेची मुत्सद्देगिरी सुरु । USA will talking another nations for ban on taliban

    तालिबानी सत्तेला मान्यता देण्याची कोणत्याच देशाला नाही घाई, अमेरिकेची मुत्सद्देगिरी सुरु

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीला मान्यता देण्याची अमेरिकेसह जगातील अनेक देशांना कोणतीही घाई नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. USA will talking another nations for ban on taliban

    जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तालिबानला कितपत यश येते, त्यावर बरेच काही अवलंबून आहे, असे ‘व्हाइट हाऊस’च्या माध्यम प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले. ‘आम्ही अनेक देशांच्या प्रतिनिधींशी अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि तालिबानी राजवटीबाबत बोललो आहोत. त्यांच्या सत्तेला मान्यता देण्याची कोणालाही घाई नाही. त्यांनी जगाच्या अपेक्षा आधी पूर्ण कराव्यात. सत्ता बळकावताना दिलेल्या आश्वायसनांचीही पूर्तता करावी,’ असे साकी यांनी सांगितले.



    दरम्यान गेली वीस वर्षे अमेरिकेच्या ताब्यात असलेला काबूल विमानतळ कतारच्या ताब्यात दिला जाण्याची चर्चा आहे. या विमानतळाचे कामकाज चालविण्याची जबाबदारी तालिबानने कतारकडे सोपविली जाण्याची शक्यता असून त्यांचे तांत्रिक पथक आज काबूलला दाखलही झाले आहे. या विमानतळाचे कामकाज तुर्कस्तानने चालवावे अशी तालिबानची इच्छा होती, मात्र तुर्कस्तानकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कतारचे तांत्रिक पथक केवळ विमानतळाच्या कामकाजासाठी तांत्रिक सहकार्य करणार आहे.

    USA will talking another nations for ban on taliban

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Hamid Ansari : माजी उपराष्ट्रपती अन्सारी यांनी गझनवीला भारतीय लुटारू म्हटले; भाजपने म्हटले- ही विकृत मानसिकता, काँग्रेसला गझनवीच्या 17 हल्ल्यांवर पांघरूण घालायचे आहे का?

    सुनेत्रा पवारांच्या निर्णयातून शरद पवार “नॉन प्लस”; आपल्याला विचारले नसल्याची त्यांचीच कबुली!!; पवारांनी “डाव” टाकण्यापूर्वीच निर्णय!!

    Chairman CJ Roy : आयकरच्या छाप्यावेळी उद्योजकाची आत्महत्या; कॉन्फिडेंट ग्रुपच्या चेअरमनची 9000 कोटींची मालमत्ता