विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – भारताला मदत करण्याचा निश्च,य अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने केला असल्याची ग्वाही देत भारत सुस्थितीत राहण्यात अमेरिकेचेही हित आहे, असे अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी स्पष्ट केले. USA will help India in corona crisis kamala harris
या जागतिक साथीच्या सुरुवातीस आमच्या रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता जाणवत होती, तेव्हा भारताने मदत पाठविली होती आणि आज भारताला गरज असताना आम्ही त्यांना मदत करण्यास बांधिल आहोत.
कोरोनाकाळात भारतासाठी दहा कोटी डॉलरची मदत करण्याची घोषणा बायडेन -हॅरिस यांच्या सरकारने केली असून विविध प्रकारची मदत घेऊन सहा विमाने गेल्या आठवड्यात भारतात पोचली आहेत. या विमानांमधून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स, जलद चाचणी किट, औषधे आणि एन९५ मास्क मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात आले आहे.
अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यापासून परराष्ट्रीय वकिलात आणि वाणिज्य दूतावासातील पथकांसह संपूर्ण सरकार भारताला आवश्यणक ती मदत करण्यासाठी झटत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंिकन आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही भारतातील संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत, अशी माहिती दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहार विभागाचे वरिष्ठ सल्लागार एरविन मसिंगा यांनी याच कार्यक्रमात दिली.
USA will help India in corona crisis kamala harris
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईच्या कोरोना मॉडेलमागे काळंबेरं, आकडेवारी उजेडात येऊ दिली जात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
- कोरोनाविरोधात लढण्यासाठी अदानी ग्रुपचे योगदान, ऑक्सिजन वाहतुकीसाठी ४८ क्रायोजेनिक टॅँकरची खरेदी
- मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील चार हजार पाने गायब, भाजपााचा धक्कादायक आरोप
- डीआरडीओच्या या औषधामुळे कोरोना अडीच दिवस अगोदर होतो बरा