वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : दहशतवाद माजवणाऱ्या देशांना आणि दहशतवाद पीडित देशांना एकाच तागडीत तोलू नका, अशा परखड शब्दांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांना सुनावले. QUAD अर्थात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी जयशंकर वॉशिंग्टनला आले आहेत. तिथे त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतलाच, पण त्याचवेळी सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची द्विपक्षीय वाटाघाटी केल्या.
जयशंकर यांनी अमेरिकन परराष्ट्र धोरणाविषयी परखड मते व्यक्त केली. दहशतवाद माजवणारे देश आणि दहशतवाद पीडित देश यांना एकाच तागडीत तोलू नका. दोघांनाही समान वागणूक देऊ नका. “क्वाड” सदस्य देशांनी दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली पाहिजे. भारताची भूमिका समजावून घेऊन भारताला पाठिंबा दिला पाहिजे. दहशतवाद्यांच्या कृत्यांपासून भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याचा भारताला हक्क आहे तो आम्ही बजावणारच, अशा शब्दांमध्ये जयशंकर यांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांना सुनावले.
पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “डिप्लोमॅटिक लंच” दिले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात न झालेल्या शस्त्र संधीचे सोळा वेळा क्रेडिट घेतले. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी वॉशिंग्टन मध्ये जाऊन आपले समकक्ष असणाऱ्या अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांना बरेच खडे बोल सुनावले.
त्यानंतर एस. जयशंकर यांनी पेंटागॉन बिल्डिंगमध्ये जाऊन अमेरिकन संरक्षण मंत्री पिट हेग्सेट यांच्याशी द्विपक्षीय वाटाघाटी केल्या. या वाटाघाटींमध्ये देखील जयशंकर यांनी भारताची दहशतवादाविरुद्धची कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. भारत आणि अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप वर त्यांनी भर दिला.
US Secretary of State Marco Rubio met External Affairs Minister Dr S Jaishankar
महत्वाच्या बातम्या
- Nitish Kumar : कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून ‘जेडीयू’ने साधला ममता बॅनर्जींवर निशाणा
- T Raja Singh : तेलंगणात भाजप आमदार टी राजा सिंह यांनी दिला राजीनामा
- Finance Minister Sitharaman : भारत-अमेरिका व्यापार करारावर अर्थमंत्री सीतारामन यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या..
- Maharashtra to Telangana : महाराष्ट्रापासून तेलंगणापर्यंत ५ राज्यांमध्ये भाजपने अध्यक्षांची केली नियुक्ती