वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांचे विशेष दूत नोकचूक डोंगचॉंग यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अंथनी ब्लिंकेन यांची आज राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली.अमेरिकन सरकार तिबेटच्या स्वतंत्र सरकारला अधिमान्यता देण्याच्या प्रक्रियेला वेग देऊ इच्छिते.US Secretary of State Anthony Blinken’s meeting with the Dalai Lama’s Special Envoy in Delhi; China – Taliban kiss Katshah
या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांचे विशेष दूत नोकचूक डोंगचॉंग यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. अमेरिकेने आता तिबेटचे स्वतंत्र अस्तित्व मानण्यास सुरुवात केली आहे आमच्या सरकारला लवकरच त्यांची अधिमान्यता मिळू शकते. आम्ही अमेरिकन सरकारचे आणि जनतेचे आभार मानतो असे तिबेट सरकारचे प्रतिनिधी तेन्झिंग लेकशाय यांनी सांगितले.
तिबेट सरकारच्या पंतप्रधानांची सहा महिन्यांपूर्वी बायडेन सरकारमधील आशिया विषयक मंत्र्यांनी पेंटॅगॉन मध्ये भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ अधिकारी म्हणून परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी दलाई लामांच्या विशेष दूत यांची भेट घेणे याला राजनैतिक पातळीवर अतिशय महत्त्व आहे.
चीनची राजधानी बीजिंगमध्ये परवाच अफगाणिस्तानातील तालिबानच्या प्रतिनिधींची चीनच्या वरिष्ठ मंत्र्यांनी भेट घेतली. तालिबान सरकारला मान्यता देण्याच्या दिशेने चिनी कम्युनिस्ट राजवटीची पावले पडत आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतात मोदी सरकारने तिबेटच्या सरकारला अमेरिकन अधिमान्यतेला एक प्रकारे वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांची दलाई लामा यांच्या विशेष दूतांची भेट नवी दिल्लीत घडवून देणे याला भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनेही राजनैतिक विशेष महत्त्व आहे.
दलाई लामा यांनी कायमच आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता संवर्धन या विषयाला महत्त्व दिले. संवाद वाढविण्यावर त्यांचा भर असतो असे तिबेटच्या प्रतिनिधींनी या भेटीनंतर स्पष्ट केले.
US Secretary of State Anthony Blinken’s meeting with the Dalai Lama’s Special Envoy in Delhi; China – Taliban kiss Katshah
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत लस दिली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालक अनुत्सुक
- प्रतिमा मलिन केली जात असल्याचा शिल्पा शेट्टीचा आरोप, माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव
- जावई तुरुंगात जातील त्यावेळी केंद्रातील सरकार पडेल, भाजपवर टीका करताना आपचा गांधी कुटुंबियांवर निशाणा
- आम्हाला काही करण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधानेच पडेल, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत एकत्र येण्यास बंधने, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट