• Download App
    US Sanctions भारताच्या 19 कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध;

    US Sanctions : भारताच्या 19 कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध; बँकिंग प्रणालीत ब्लॅकलिस्ट, युक्रेनविरुद्ध रशियाला मदत केल्याचा आरोप

    US Sanctions

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : US Sanctions अमेरिकेने भारताच्या १९ कंपन्यांसह रशिया, चीन, मलेशिया, थायलंड, तुर्की, संयुक्त अरब अमिरात आदी एक डझनांहून अधिक देशांतील ३९८ कंपन्यांवर निर्बंध लावले आहेत. या कंपन्या फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण झाल्यापासून रशियाला उपकरणे उपलब्ध करून देत असल्याचा व रशिया त्यांचा वापर युक्रेनविरुद्ध युद्धात करत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. यापैकी बहुतांश कंपन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या पुरवठादार आहेत. भारत सरकारने अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.US Sanctions

    अमेरिकेने सांगितले की, आमच्या परराष्ट्र, ट्रेझरी व वाणिज्य विभागाने हे निर्बंध लावले आहेत. परराष्ट्र विभागाने रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व संरक्षण कंपन्यांवरही राजनैतिक निर्बंध लावले आहेत. निर्बंधाचा उद्देश तिसऱ्या पक्षाच्या देशांना दंड करणे आहे. ट्रेझरी विभागाचे उपसचिव व्हॅली ॲडेइमो म्हणाले, अमेरिका व त्याचे सहकारी ‘रशियाला मदत करणाऱ्यांना रोखण्याच्या संकल्पावर ठाम आहेत.’



    या आहेत भारताच्या कंपन्या

    ॲसेंड एव्हिएशन इंडिया प्रालि., मास्क ट्रान्स, टीएसएमडी ग्लोबल प्रालि., फुट्रेव्हो, अबहार टेक्नोलॉजीज अँड सर्विसेस प्रालि., डेनव्हास सर्विसेस प्रालि., ईएमएसवाय टेक, गॅलेक्सी बिअरिंग्स लि., इनोव्हियो व्हेंचर्स, केडीजी इंजीनिअरिंग प्रालि., खुशबू ऑनिंग प्रालि., लोकेश मशीन्स लि., ऑर्बिट फिनट्रेड एलएलपी, पॉइंटर इलेक्ट्रॉनिक्स, आरआरजी इंजीनिअरिंग टेक्नोलॉजीज प्रालि., शार्पलाइन ऑटोमेशन प्रालि., शौर्य एअरोनॉटिक्स प्रालि., श्रीजी इम्पेक्स प्रालि., श्रेया लाइफ सासंसेस प्रालि.

    ॲसेंड एव्हिएशनने मार्च २०२३ व मार्च २०२४ दरम्यान रशियन कंपन्यांना ७०० हून अधिक शिपमेंट पाठवल्याचा आरोप आहे. मास्क ट्रान्सने जून २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान सुमारे २.५ कोटी रुपयांचे सामान पाठवले. त्यांचा वापर रशियाने एव्हिएशनशी संबंधित कामांत केला. टीएसएमडी ग्लोबलवर आरोप आहे की, त्यांनी ३.६ कोटी रुपयांहून अधिकचे इलेक्ट्रॉनिक इंटीग्रेटेड सर्किट, सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट आणि कॅपेसिटर रशियन कंपन्यांना पाठवले आहेत .

    तज्ज्ञांनी सांगितले की, निर्बंधांच्या माध्यमातून कंपन्यांना स्विफ्ट बँकिंग सिस्टिममध्ये काळ्या यादीत टाकले जाते. यामुळे या कंपन्या रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या विरोधात असलेल्या देशांसोबत कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. ज्या कंपन्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत त्यांच्या मालमत्ताही या निर्बंधांच्या बाजूने असलेल्या देशांमध्ये फ्रीज होऊ शकतात. अमेरिकेला असे वाटते की, रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत व्हावी. तसेच ज्याच्या मदतीने ते युक्रेनमध्ये युद्ध लढत आहेत त्यांच्याकडून रशियाच्या संरक्षण उद्योगाला उपकरणे मिळू नयेत. तथापि, या निर्णयामुळे भारत-अमेरिकेतील संबंधांवर कोणताच परिणाम होणार नाही. कारण दोन्ही देशांत आधीपासूनच चांगले संबंध आहेत.

    अमेरिकेने २ भारतीयांवरही निर्बंध लावले आहेत. त्यात विवेक कुमार मिश्रा व सुधीर कुमार यांचा समावेश आहे. दोघे ॲसेंड एव्हिएशनचे आहेत. दिल्लीची ही कंपनी विमान उद्योगास सुटे भाग आणि वंगण पुरवते.

    US Sanctions on 19 Indian Companies; Blacklist in banking system

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!