विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत आणि पाकिस्तान मधले अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते, अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणाच्या आधीच निवेदन करून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अमेरिकेची “मेख” मारून ठेवली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने यशस्वी मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.
– डोनाल्ड ट्रम्प म्हणाले :
– आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या हत्याराचा ज्या पद्धतीने मी प्रभावी वापर केला तसा कोणी अजून केला नाही. मी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नेतृत्वांना सांगितले, की तुम्ही ताबडतोब युद्ध थांबवा. अमेरिका तुमच्याशी मोठा व्यापार करेल. तुम्ही युद्ध थांबविले नाही, तर अमेरिका तुमच्याशी कुठलाही व्यापार करणार नाही. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या नेतृत्वांनी प्रगल्भता दाखवून ताबडतोब युद्ध थांबविले.
– अमेरिकेने संभाव्य अणुयुद्ध टाळले, अन्यथा लाखो लोक त्या अणुयुद्धात मेले असते. हे युद्ध टाळण्यासाठी उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांची फार मदत झाली. त्यांचे मी आभार मानतो.
– अमेरिका भारताबरोबर व्यापार कराराच्या वाटाघाटी करतच आहे पाकिस्तान बरोबर देखील लवकरच अमेरिका व्यापाराच्या वाटाघाटी सुरू करेल.
US President Donald Trump says, “We’re going to do a lot of trade with Pakistan
महत्वाच्या बातम्या
- भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा
- ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी
- कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!