• Download App
    अमेरिका - पाकिस्तान संबंध दोन्ही देशांसाठी ठरले नाकाम; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे परखड मतUS-Pakistan relations have failed for both countries

    अमेरिका – पाकिस्तान संबंध दोन्ही देशांसाठी ठरले नाकाम; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे परखड मत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संपूर्ण पाकिस्तान देश राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि नैसर्गिक समस्यांच्या गर्तेत रुतला असताना अमेरिकेने पाकिस्तानला f16 विमानांच्या मेंटेनन्स साठी नुकताच कोट्यावधी डॉलरचा निधी रिलीज केला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी अमेरिका – पाकिस्तान संबंधांवर परखड भाष्य केले आहे. अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध खूप जुने असले तरी ते दोन्ही देशांच्या राष्ट्रीय हितासाठी फुलद्रूप ठरले नाहीत किंबहुना नाकामच ठरले आहेत, असे मत जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. US-Pakistan relations have failed for both countries

    अमेरिका – पाकिस्तान संबंधांची चिकित्सा करताना जयशंकर म्हणाले, की f16 ची क्षमता सगळ्यांना माहिती आहे ती विमाने कुठे तैनात केली आहेत हेही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही हे सगळे दहशतवाद विरोधात कार्यवाही करण्यासाठी करतो आहोत असे सांगून अमेरिका आणि पाकिस्तान हे दोन देश इतरांना किती दिवस मूर्ख बनवू शकणार आहेत?? अमेरिकेने पाकिस्तानसाठी जेवढ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली, त्याचे फळ अमेरिकेला काय मिळाले?? किंवा पाकिस्तानला देखील राष्ट्रीय हितासाठी त्याचा कितपत लाभ झाला??, याचा वास्तववादी विचार केला तर हे संबंध फलद्रूप झाले नसल्याचेच दिसून येईल.

    मी कधीतरी अमेरिकन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना हे विचारीन की, भारताचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवा पण अमेरिकेने जेवढी म्हणून गुंतवणूक पाकिस्तानात केली याचा खुद्द अमेरिकन राष्ट्रीय हितासाठी किंवा पाकिस्तानी राष्ट्रीय हितासाठी देखील याचा लाभ किती झाला?, दोन्ही देशांच्या हाती नेमके काय लागले?? याची गुणवत्तेच्या आधारावर पडताळणी कधी करणार आहात की नाही?? तशी पडताळणी केली तर अमेरिकेने जेवढी किंमत मोजली आहे त्या पटीत त्यांना खरंच लाभ झाला नाही आणि दोन्ही देशांचे संबंध फलदरूप झाले नाहीत हाच निष्कर्ष काढावा लागेल.

    अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने ज्यावेळी पाकिस्तानला एफ f16 विमानांच्या मेंटेनन्स साठी काही लाख डॉलर्सचा निधी दिला आहे, त्यावेळी दोन्ही देशांच्या संबंधांवर जयशंकर यांनी परखड मत व्यक्त करणे याला विशिष्ट महत्त्व आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली गेली आहे.

    US-Pakistan relations have failed for both countries

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!