विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारतातील अमेरिकेचे राजदूत अतुल केशप यांचा बुधवारी कार्यालयातील आपल्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. राष्ट्रनिर्मितीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार ऐकून ते भारावून गेले.US Ambassador to India meets Sarsanghchalak, overwhelmed by RSS’s idea of nation building
भारतातील विविधता, लोकशाही आणि सर्वसमावेशकता यावर मोहन भागवत यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. ही पारंपरिक मूल्ये एका महान राष्ट्राची ऊर्जा आणि शक्ती कशी बनू शकतात हे त्यांनी स्पष्ट केलं, असं केशप म्हणाले.
केशप यांनी मोहन भागवत यांची भेट घेतल्याचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी एक ट्वीटही शेअर केलं. आज रात्री आपण वॉशिंग्टनला रवाना होत आहोत. भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून काम करणं हा गौरव आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. भारत-अमेरिकेचे संबंध घट्ट आहेत आणि ते तसेच राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते. प्रत्येक भारतीय हिंदू आहे. समजूतदार मुस्लिम नेत्यांनी कट्टरपंथियांविरोधात एकजुटीने उभं राहिलं पाहिजे. हिंदू शब्द हा मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या समान आहे.
यातून इतर विचारांचा अपमान होत नाही. आपण मुस्लिम वर्चस्वाबाबत नाही तर भारताच्या वर्चस्वाबाबत विचार केला पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते.
US Ambassador to India meets Sarsanghchalak, overwhelmed by RSS’s idea of nation building
महत्त्वाच्या बातम्या
- बार्टीचे अनुदान रोखल्यामुळे महाविकास आघाडीचा दलितविरोधी चेहरा उघड, राजकुमार बडोले यांची टीका
- अफगाणिस्तानमधील नवीन तालिबान शिक्षणमंत्र्यांनी अभ्यासाला निरुपयोगी ठरवले , म्हणाले – पीएचडी किंवा मास्टर्स डिग्रीला नाही मूल्य
- नांदेड एक झलक होती, सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- कापड उद्योगाला प्रोत्साहनासाठी केंद्र सरकार देणार १०,६३३ कोटी रुपयांचे अनुदान