एरिक गार्सेट्टी यांच्या आगमानाचा आणि विशेष स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेचे भारतातील नवनियुक्त राजदूत एरिक गार्सेटी भारतात पोहोचले आहेत. एरिक गार्सेट्टी यांचे नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. विशेष बाब म्हणजे एरिक गार्सेटी रिक्षाने अमेरिकन दूतावासात पोहोचले. अमेरिकन दूतावासानेही त्यांच्या आगमानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. US ambassador Eric Garcetti entered the embassy in Delhi by rickshaw
यूएस दूतावासातील काही कर्मचारी प्रवासासाठी ऑटोचा वापर करतात आणि यापूर्वी जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनीही ऑटो राईडचा आनंद लुटला होता.
अमेरिकेच्या राजदूताची दोन वर्षांनी नियुक्ती –
भारतातील अमेरिकेच्या राजदूताची नियुक्ती गेल्या दोन वर्षांपासून रखडली होती. खरे तर अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकार गेल्यानंतर भारतातील अमेरिकेच्या राजदूतांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर २०२१ मध्ये, बायडेन यांनी लॉस एंजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेट्टी यांची भारतातील अमेरिकेचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली.
लॉस एंजेलिसचे महापौर असताना गार्सेट्टी यांच्यावर एका सहकाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप असला, त्यामुळे अमेरिकन सिनेटने गार्सेट्टी यांच्या नावाला मंजुरी दिली नव्हती. यानंतर चौकशी समिती बसली आणि वर्षभर सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मतदान झाले, जिथे गेल्या मार्चमध्ये एरिक गार्सेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.
US ambassador Eric Garcetti entered the embassy in Delhi by rickshaw
महत्वाच्या बातम्या
- Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांचे निळ्या रंगाशी नेमके नाते काय?
- राज्यघटनेच्या शिल्पकाराला, कोट्यवधीसाठी महामानव असलेल्या डॉ. आंबेडकरांना ४ दशके उशीरा
- राहुल गांधी – पवारांसह सर्व विरोधकांच्या तोंडी एकीची भाषा, पण मग बेकी होतीये तरी का??
- विधवांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्द वापरण्यावरून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर आमनेसामने…