विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – अमेरिकी सैनिकांनी इराक आणि सीरियाच्या सीमाभागात असलेल्या इराण समर्थक दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. सीरियातील इराण समर्थक दहशतवादी संघटनांकडून इस्राईलला मोठा धोका असल्याचे मानले जात असताना अमेरिकेने केलेली कारवाई महत्त्वाची आहे. US airstrikes on terrorists along the Iraq-Syria border
यात सीरियातील शस्त्रास्त्रांचा साठा असलेली दोन ठिकाणं आणि इराकमधील एका ठिकाणांचा समावेश आहे. या कारवाईत किती जण मृत किंवा जखमी झाले हे मात्र उघड केलेले नाही. या हल्ल्यासंदर्भातील माहिती गोळा केली जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या निर्देशानुसार हल्ले केल्याचे पेटॉंगॉनने म्हटले आहे. बायडेन यांनी हवाई हल्ले करण्यासंदर्भात दिलेला हा दुसरा आदेश आहे. यापूर्वी बायडेन यांनी फेब्रुवारीत सीरियात हल्ले करण्याचे आदेश दिले होते. ही कारवाई इराकमधील रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी केली होती. अध्यक्षांनी दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कारवाईचे निर्देश दिले. स्वसंरक्षणाच्या हक्कातून अमेरिकेने कारवाई केली आहे.
US airstrikes on terrorists along the Iraq-Syria border
महत्त्वाच्या बातम्या
- बोलतो त्याप्रमाणे चालतो याचा अर्थ वाघ सर्कशीतलाच, त्याचा रिंगमास्टरही वेगळा, नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला
- ओबीसी आरक्षणात आता चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या विवाहाची
- कुणी आम्हाला डिवचले, धमकी दिली तर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
- गांधी परिवारवादाचे ठीक आहे, पण “असे” राजकीय वारसे सोडून दिल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळते त्याचे काय…??