प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील दिव्यांगांना युपीएससी निवड प्रक्रियेत तात्पुरत्या स्वरूपात आयपीएस, आयआरपीएफएस, DANIPS सेवांसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्याचे अंतरिम आदेश सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिले आहेत. “नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर द राइट्स ऑफ डिसेबल्ड”ने याप्रकरणी रिट याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टाने वरील आदेश दिले आहेत.UPSC Positive News: Opportunity for other big posts with IPS for the disabled now !!; Interim order of the Supreme Court
विविध पदांसाठी अर्ज करण्याची परवानगी
कोर्टाच्या या आदेशानुसार नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींना भारतीय पोलीस सेवा, भारतीय रेल्वे संरक्षण दल सेवा आणि दिल्ली, दमण आणि दीव, दादरा-नगर हवेली, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप पोलीस येथील निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तात्पुरते अर्ज करता येणार आहे. न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने या सेवांमधून दिव्यांगांना वगळण्याविरोधात आव्हान देणार्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान वरील आदेश दिले आहेत.
– दिव्यांगांना संधी
या प्रकरणी खंडपीठाने विनंतीच्या संदर्भात भारताचे ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांचे मत विचारले असता, ते म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याची परवानगी दिली जाऊ शकते आणि याला लॉर्डशिपच्या आदेशानुसार वेगळ्या कव्हरमध्ये ठेवता येऊ शकते असे सांगितले. तसेच याचिकाकर्त्यांनी आणि तत्सम याचिकाकर्त्यांनी 1 एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष किंवा कुरिअरद्वारे अर्ज सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. तसेच 1 एप्रिल रोजी दुपारी 4 नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
निवड प्रक्रियेत अडथळा नाही
तसेच हा आदेश सध्या सुरू असलेल्या निवड प्रक्रियेत अडथळा आणणारा आहे असे समजू नये असे देखील खंडपीठाने स्पष्ट केले असून, या प्रकरणावर 18 एप्रिल रोजी पुढील सुनावणी केली जाईल असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
UPSC Positive News: Opportunity for other big posts with IPS for the disabled now !!; Interim order of the Supreme Court
महत्त्वाच्या बातम्या
- SONU NIGAM : महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या भावाकडून सोनू निगमला धमकी ! आयुक्तांनीच करून दिली होती ओळख …
- काश्मिरी पंडितांची पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव, 1990च्या नरसंहाराची पुन्हा चौकशी करण्याची मागणी
- Yogi Adityanath : योगी मंत्रिमंडळात ब्रजेश पाठक उपमुख्यमंत्री, स्वतंत्र देव सिंग मंत्री; डॉ. दिनेश शर्मांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी??
- मला मारण्याचे कटकारस्थान रचले होते; नीतेश राणे यांचा खळबळजनक आरोप