• Download App
    UPSC Result 2025: Rushikesh Alase Ranks 61st, First in Maharashtra VIDEOS UPSC निकालात महाराष्ट्राचा डंका!; 60 पेक्षा अधिक उमेदवार यशस्वी, ऋषिकेश आलासे देशात 61 वा क्रमांक मिळवत राज्यात प्रथम

    UPSC Result 2025 : UPSC निकालात महाराष्ट्राचा डंका!; 60 पेक्षा अधिक उमेदवार यशस्वी, ऋषिकेश आलासे देशात 61 वा क्रमांक मिळवत राज्यात प्रथम

    UPSC Result 2025

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : UPSC Result 2025 केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -2025 मध्ये देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात राज्यातील 60 हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे.UPSC Result 2025

    केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष 2025 च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. ऋषीकेश आलासे 61, आकाश त्रिवेदी यांनी 73, गौरव चोपडा यांनी 83, सायली पगार यांनी 87, वा तर दिक्षा पाटकर यांनी 88 वा क्रमांक पटकावला आहे.UPSC Result 2025



    महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांची यादी

    ऋषिकेश आलासे (६१), आकाश त्रिवेदी (७३), गौरव चोप्रा (८३), सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१)

    परीक्षेचा प्रवास आणि निकाल

    केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण ९५८ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे.

    कोणत्या प्रवर्गातून किती उमेदवार?

    यामध्ये सामान्य (ओपन) गटातून – ३१७, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) – १०४, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – ३०६, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – १५८, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ७३ उमेदवारांचा समावेश आहे.

    लोकसेवा आयोगाने २५८ उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट – १२९, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) – २६, इतर मागास वर्ग – ८६, अनुसूचित जाती – ०८, अनुसूचित जमाती – ०६ उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण तीन दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

    या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

    भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण १८० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – ७४, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) १८, इतर मागास वर्ग (ओबीसी) – ४७, अनुसूचित जाती (एससी) – २८, अनुसूचित जमाती (एसटी) – १३ जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

    आयएफएस सेवेत ५५ जागा रिक्त

    भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण – ५५ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – २२, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) – ०६, इतर मागास वर्ग (ओबीसी) – १५, अनुसूचित जाती (एससी) – ०८, अनुसूचित जमाती (एस.टी.) – ०४ जागा रिक्त आहेत.

    आयपीएस सेवेत १५० जागा रिक्त

    भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण – १५० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – ६०, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) १५, इतर मागास प्रवर्गातून – ४२, अनुसूचित जाती प्रवर्गातून – २२, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ११ उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

    UPSC Result 2025: Rushikesh Alase Ranks 61st, First in Maharashtra VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटक मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार; असे करणारे देशातील पहिले राज्य, पालकांची परवानगी आवश्यक

    Iranian Warship : इराणची एक युद्धनौका भारतात असल्याचा दावा, 183 खलाशी उपस्थित, तांत्रिक बिघाडानंतर मागितली मदत

    Nitish Kumar :” नितीश कुमार 10-14 मार्चदरम्यान राजीनामा देऊ शकतात; मुलगा निशांत 8 मार्च रोजी JDU मध्ये सामील होणार;