वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Muslim reservation कर्नाटकात मुस्लिमांना सार्वजनिक कंत्राटात ४% आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सोमवारी राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. भाजप खासदारांनी हा मुद्दा उचलत काँग्रेसवर घटना बदलण्याचा आरोप केला. संसदीयकार्य मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जे घटनात्मक पदावर आहे, त्यांनी सांगितले की, पक्ष घटना बदलून मुस्लिमांना आरक्षण देईल. हे कुणी सामान्य माणसाने म्हटले असते तर आम्ही गांभीर्याने घेतले नसते.Muslim reservation
भाजपाध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले होते की, धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाणार नाही. मात्र, काँग्रेस ते बदलण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने कंत्राट देण्यातही मुस्लिमांना आरक्षण दिले आहे. हे घटनेच्या मूळ भावनेच्या विरोधात आहे.
चर्चा सुरू, २०३० पर्यंत व्यापार ४३ लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट
वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सांगितले की, अमेरिका-भारत बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करत आहे. व्यापार करार झाल्यावर शुल्क आणि बिगर शुल्क अडचणी कमी होतील. भारत आणि अमेरिका २०३० पर्यंत परस्पर व्यापार ४३ लाख कोटींपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. प्राप्तिकर रिटर्नवर चर्चा करताना चौधरी म्हणाले, चार वर्षांत ९० लाख अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले आहेत. यामुळे सरकारला ९,११८ कोटींचा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे. दुसरीकडे, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, १० वर्षांत १,७३३ चौ.किमी वन भूमी प्रकल्पांसाठी बिगर वन वापरासाठी मंजुरी दिली, जी दिल्लीच्या एकूण क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे.
आम्ही घटनेचे रक्षक, बदलणारे नाही- काँग्रेस
भाजपच्या आराेपांना उत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, घटना कुणी बदलू शकत नाही. काँग्रेसच राज्यघटनेची रक्षक आहे. भाजप भारताला तोडण्याचे काम करत आहे. त्यांनी सांगितले की, भाजप सतत खोटे पसरवत आहे व कर्नाटक सरकारने घटनेनुसार निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की, अपयश झाकण्यासाठी भाजपने एका षडयंत्राअंतर्गत संसद रोखली. न्यायसंस्थेत भ्रष्टाचार समोर आला,त्यावर चर्चा होऊ नये हा उद्देश आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी धर्म आधारित आरक्षणासाठी घटना दुरुस्तीचा पुरस्कार करण्याचे आरोप फेटाळले. त्यांनी सांगितले की, भाजपने त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर केले. काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले की, त्यांनी कधीही घटना दुरुस्तीचा उल्लेख केला नाही. शिवकुमार म्हणाले, मी ३६ वर्षांपासून आमदार आहे आणि जबाबदारी चांगली समजतो. मी फक्त हे सांगितले होते की, काळानुसार बदल होतो.
काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी प्रकरणात नड्डा व रिजिजूविरुद्ध विशेषाधिकार हनन नोटीस दिली आहे.
Uproar over Muslim reservation; BJP says, will not allow constitution to be changed
महत्वाच्या बातम्या
- दोंडाईचा सौर प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे ऊर्जा विभागाला विशेष निर्देश, म्हणाले…
- Sanjay Shirsat सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांची घोषणा; 25 हजार विद्यार्थ्यांसाठी 125 वसतिगृहे सुरू करू, 1500 कोटींचा निधी राखीव
- Koradi ‘’कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा’’ ; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश!
- कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर टिप्पणी केली होती, ‘त्या’ स्टुडिओवर पडला BMCचा हातोडा