सोमवारीही वक्फ विधेयकावरून सभागृहात मोठा गोंधळ झाला होता
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर: Jammu and Kashmir बुधवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभागृहात घोषणाबाजीने सुरू झाली आणि गदारोळाचे रूपांतर परस्पर हाणामारीत झाले. आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सभागृहात एकमेकांशी भिडले. दोन्ही पक्षांचे आमदार एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करताना दिसले. त्याच वेळी, नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनीही यावेळी घोषणाबाजी केली. हा वाद इतका चिघळला की, नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार सभागृहाच्या मध्यभागी आले आणि त्यांनी वक्फ कायद्यावर चर्चा करण्याची मागणी केली.Jammu and Kashmir
वक्फ कायद्यावर सभागृहात चर्चा व्हावी अशी नॅशनल कॉन्फरन्सची मागणी आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी याला विरोध केला आणि त्यावर कोणतीही चर्चा होऊ देणार नसल्याचे सांगितले. विधानसभेच्या बाहेर प्रवेशद्वारावर भाजप आणि आम आदमी पक्षाच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली.
सोमवारीही वक्फ विधेयकावरून सभागृहात मोठा गोंधळ झाला होता. सोमवारी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचे अध्यक्ष अब्दुल रहीम राठर यांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पहिल्यांदाच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. सभागृह सुरू होताच, नझीर गुरेझी आणि तन्वीर सादिक यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सच्या सदस्यांनी वक्फ कायद्यावर चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि काही अपक्ष आमदारांसह एकूण नऊ सदस्यांनी या मुद्द्यावर सभापतींना नोटीस दिली होती.
Uproar again in Jammu and Kashmir Assembly AAP and BJP MLAs clash
महत्वाच्या बातम्या