• Download App
    10 देशांतील अनिवासी भारतीयांसाठी UPI सुविधा सुरू; केंद्र सरकारची योजना UPI facility launched for NRIs in 10 countries; Scheme of Central Govt

    10 देशांतील अनिवासी भारतीयांसाठी UPI सुविधा सुरू; केंद्र सरकारची योजना

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी रुपे डेबिट कार्ड आणि भीम ॲप साठी 2600 कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर केंद्र सरकारने UPI व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखली आहे. आता परदेशातील भारतीय नागरिकांनाही व्यवहारासाठी UPI चा वापर करता येणार आहे. आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकाच्याआधारे युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर करत व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. UPI facility launched for NRIs in 10 countries; Scheme of Central Govt

    10 देशांतील अनिवासी भारतीयांना भारतीय मोबाईल क्रमांकाच्याआधारे युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर करत व्यवहार पूर्ण करता येणार आहे. 10 देशांतील अनिवासी भारतीयांना भारतीय मोबाईल क्रमांकाच्या आधारे या रक्कमेची देवाण-घेवाण करता येईल. सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाॅंगकाॅंग, ओमान, कतर, सऊदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि इंग्लडमध्ये UPI सेवा सुरू करण्यात आली आहे.


    RBIची नवीन सुविधा : लवकरच सर्व ATM मध्ये कार्डलेस पैसे काढता येणार, सध्या फक्त काही बँकांकडेच आहे ही सुविधा


    NRO खाते परदेशातील भारतीयांसाठी फायदेशीर 

    राष्ट्रीय देयके महामंडळानुसार, NRI अथवा एनआरओ युपीआय व्यवहार करु शकतील. यासर्व प्रक्रियेसाठी पार्टनर बॅंकांसाठी 30 एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. NRI खाते परदेशातील भारतीयांना परदेशातील कमाई आता भारतातील खात्यात सहज हस्तांतरित करता येणार आहे. एनआरओ अकाऊंट नागरिकांना भारतातील कमाईचे व्यवस्थापन करण्यास मदत करेल.

    केंद्र सरकाराने रुपे डेबिट कार्ड आणि भीम- युपीआय व्यवहारांना अधिक गती देण्यासाठी प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका सामान्य वापरकर्त्यासह व्यापा-यापर्यंत सर्वांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे सरकारने त्यासाठी एकूण 2600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

    UPI facility launched for NRIs in 10 countries; Scheme of Central Govt

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य