भाजपही एका जागेवर उमेदवार देणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. बिहारमधून दोन्ही जागांवर एनडीएचे उमेदवार राज्यसभेवर जातील. या पैकी एका जागेवर आरएलएमचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha )यांना एका जागेवर राज्यसभेवर पाठवले जाणार आहे.
आरएलएमचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनीही सोशल मीडिया X वर याबाबत माहिती दिली आहे. उपेंद्र कुशवाह यांनी लिहिले की, नामांकन आता 20 ऑगस्टला नाही तर 21 ऑगस्टला केले जाईल. म्हणजेच उपेंद्र कुशवाह 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
वास्तविक, राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा 21 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. तर दुसऱ्या जागेवर भाजपचा उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य युनिटने दावेदारांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत आणि ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे सादर केली आहेत. आज उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मीसा भारती आणि विवेक ठाकूर लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन खासदार झाल्यानंतर बिहारमधील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या. निवडणूक आयोगाने 14 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली होती. नामांकनाची अंतिम तारीख 21 ऑगस्ट आहे. 22 ऑगस्ट रोजी छाननी होणार असून 27 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
एनडीएचे राज्यसभेचे उमेदवार उपेंद्र कुशवाह हे त्यांच्या करकट मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. येथे अपक्ष म्हणून उभे राहिलेले अभिनेते पवन सिंग यांच्यामुळे करकटची जागा डाव्या पक्षाकडे गेली. राजाराम सिंह यांनी येथून निवडणूक जिंकली होती. त्या पराभवानंतर एनडीएमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. आता एनडीएने उपेंद्र कुशवाह यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचा असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. मात्र, उपेंद्र कुशवाह एनडीएमध्ये येत-जात राहतात. आधी त्यांनी आपला पक्ष JDU मध्ये विलीन केला आणि नंतर वेगळे होऊन स्वतःचा पक्ष RLM स्थापन केला.
Upendra Kushwaha will be sent to Rajya Sabha from NDA
महत्वाच्या बातम्या
- Rakesh Pal : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नईत निधन
- Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांची खुसपटे; पण वरचढ योजनेची तोड का न सापडे??
- Champai Soren : झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- Sukanta Majumdar : ममतांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरूच राहणार ; सुकांता मजुमदार