जाणून घ्या, राम मनोहर लोहिया रुग्णालयाने काय सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :Sarangi राम मनोहर लोहिया रुग्णालयाने शनिवारी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या प्रकृतीची माहिती दिली. आरएमएलचे एमएस डॉ. अजय शुक्ला यांनी सांगितले की, सारंगी यांच्या गालाच्या हाडावर सूज आणि निळसरपणा आहे. तपासणीसाठी एक्सरे काढण्याचा विचार केला गेला आहे. डॉक्टरांनी सांगितले की भाजप खासदार मुकेश राजपूत यांना अजूनही थोडे चक्कर येत आहेत. त्यांना अस्वस्थ वाटत आहे.Sarangi
जखमी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांच्या सध्याच्या प्रकृतीबद्दल आरएमएल एमएस डॉ. अजय शुक्ला म्हणाले, ‘आज आम्ही पाहिले की सारंगी यांच्या गालाच्या हाडावर सूज आणि निळसरपणा आहे. हे किरकोळ फ्रॅक्चर आहे की भुवया वर दुखापत आहे आणि रक्त खालच्या दिशेने वाहत आहे हे पाहण्यासाठी आम्ही एक्स-रे काढणार आहोत. गालाच्या हाडावर थोडे रक्त जमा झाले आहे. तर मुकेश राजपूत यांना अजूनही थोडी चक्कर येत आहे. त्यांनांही अस्वस्थ वाटत आहे…आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवत आहोत.
बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित मुद्द्यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गुरुवारी संसदेच्या संकुलात निदर्शने केली. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. या हाणामारीत भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले. त्यानंतर त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Update on the health of BJP MPs Sarangi and Rajput
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोकाअंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- OP Chautala : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला यांचे निधन; शिक्षक भरती घोटाळ्यात तुरुंगवास, 86व्या वर्षी तिथूनच 10-12 वी उत्तीर्ण
- Mohan bhagwat : शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नव्हे, तर साधक असावी; पुण्यात लोकसेवा ई स्कूलचे उद्घाटन
- Bipin Rawat : देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आलं समोर!