• Download App
    योगी सरकारची मिशन 30 कोटी योजना, एकाच दिवसात करणार 25 कोटी वृक्षांची लागवड । UP Yogi governments planting 25 crore trees on 4th july, medicinal garden will be built in every district

    योगी सरकारची मिशन 30 कोटी योजना, एकाच दिवसात करणार 25 कोटी वृक्षांची लागवड

    planting 25 crore trees : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वन विभाग गुरुवार (१ जुलै) पासून राज्यात वृक्षारोपणाचे महाअभियान सुरू करणार आहे. यावर्षी 30 कोटी रोपे लावण्याचे लक्ष्य आहे. तर गतवर्षी 25 कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या वेळी रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी रोपे लावण्यावरही भर देण्यात आला आहे. 4 जुलै रोजी मोहीम राबवून एका दिवसात 25 कोटी रोपे लावली जातील. UP Yogi governments planting 25 crore trees on 4th july, medicinal garden will be built in every district


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वन विभाग गुरुवार (१ जुलै) पासून राज्यात वृक्षारोपणाचे महाअभियान सुरू करणार आहे. यावर्षी 30 कोटी रोपे लावण्याचे लक्ष्य आहे. तर गतवर्षी 25 कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या वेळी रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी रोपे लावण्यावरही भर देण्यात आला आहे. 4 जुलै रोजी मोहीम राबवून एका दिवसात 25 कोटी रोपे लावली जातील.

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहरी व ग्रामीण भागात डेरेदार व दीर्घकाळ टिकणारे वृक्ष लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय कोरोना कालावधीत शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या वनस्पतींच्या लागवडीचीही सूचना देण्यात आली आहे. विशेषतः पिंपळ, वड, कडुनिंब, जांभूळ, सागवान, देशी आंबा आणि इतर वृक्ष लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वन महोत्सवअंतर्गत वृक्षारोपण सुरू करण्यात येईल. याव्यतिरिक्त सर्व विभाग एकत्रितपणे 30 कोटी रोपे लावण्याचे लक्ष्य पूर्ण करतील. वन महोत्सवात आयोजित वृक्षारोपण मोहिमेदरम्यान कोविड प्रोटोकॉल व सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. वृक्षारोपण मोहिमेसाठी विभागांनी आपली तयारी पूर्ण केली आहे.

    वन महोत्सवाअंतर्गत एक्स्प्रेस वे, महामार्ग, रस्ते, कालवे इत्यादी ठिकाणी जास्तीत जास्त वृक्षारोपण केले जाईल. यासह औद्योगिक परिसर, शासकीय जमिनीसह इतर योग्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात औषधी बगिचा बनवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत त्यांचे भौगोलिक टॅगिंगदेखील सक्तीने केले जाईल. झाडांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात 100 वर्षांपेक्षा जास्त वयाची झाडे ओळखून त्यांना ‘हेरिटेज ट्रीज’ म्हणून जतन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

    UP Yogi governments planting 25 crore trees on 4th july, medicinal garden will be built in every district

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य