• Download App
    UP Traffic Challan : योगी सरकारकडून वाहन चालकांना मोठा दिलासा; पाच वर्षे जुने चलन रद्द करणार UP Traffic Challan  Big relief to motorists from Yogi government Five years old challan will be cancelled

    UP Traffic Challan : योगी सरकारकडून वाहन चालकांना मोठा दिलासा; पाच वर्षे जुने चलन रद्द करणार

    उत्तर प्रदेशचे परिवहन आयुक्त चंद्रभूषण सिंह यांनी हे आदेश दिले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. कारण, उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार, आता न्यायालयात प्रलंबित असलेल्या चलनाची प्रकरणे रद्द केली जातील. त्याची यादी मिळाल्यानंतर ही चलन महामंडळाच्या पोर्टलवरून काढून टाकली जाणार आहेत. उत्तर प्रदेशचे परिवहन आयुक्त चंद्रभूषण सिंह यांनी हे आदेश दिले आहेत. UP Traffic Challan  Big relief to motorists from Yogi government Five years old challan will be cancelled

    सर्व विभागीय परिवहन अधिकाऱ्यांना विभागीय पोर्टलवरून चलन काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे योगी सरकारने राज्यातील एका मोठ्या वर्गाला दिलासा दिला आहे. राज्य सरकारने खासगी तसेच व्यावसायिक वाहनधारकांना दिलासा देत सर्व चलन रद्द केले आहेत. योगी सरकारच्या या निर्णयामुळे यूपीमधील लाखो वाहनधारकांना ज्यांचे चलन गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते व त्याचे पेमेंट अद्याप झालेले नव्हते, त्यांना मोठी सूट मिळाली आहे.

    राज्य शासनाच्या निर्णयानुसार 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आकारलेले चलन रद्द करण्यात आले आहेत. न्यायालयातील प्रलंबित खटल्यांबाबत हा आदेश समोर आला आहे.

    उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या आदेशात असे सांगण्यात आले आहे की, चलनांबाबत न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांची यादी समोर आणून ही चलनं महामंडळाच्या पोर्टलवरून काढून टाकली जातील. उत्तर प्रदेश परिवहन आयुक्तांचे म्हणणे आहे की सर्व विभागीय परिवहन अधिकाऱ्यांना विभागीय पोर्टलवरून चलन काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात राज्य सरकारने राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना या सूचना दिल्या आहेत.

    सर्व कट चलन ई-पोर्टलवरून काढले जातील –

    परिवहन कार्यालयांना पाठवलेल्या सूचनांनुसार, न्यायालयात प्रलंबित असलेल्या चलनाची यादी परिवहन विभागाच्या ई-पोर्टलवरून काढण्यात येणार आहे. आदेशात असे म्हटले आहे की, 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2021 या पाच वर्षांसाठी कापून घेतलेल्या पावत्या ई-पोर्टलवरून काढून टाकण्यात आल्या आहेत.

    UP Traffic Challan  Big relief to motorists from Yogi government Five years old challan will be cancelled

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य