• Download App
    मुस्लिम महिलांवर बलात्काराची धमकी देणाऱ्या महंतावर कारवाई, यूपी पोलिसांनी केली अटक|UP Police arrests mahant for threatening to rape Muslim women

    मुस्लिम महिलांवर बलात्काराची धमकी देणाऱ्या महंतावर कारवाई, यूपी पोलिसांनी केली अटक

    उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक मिरवणुकीत मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी महंत बजरंग मुनिदास यांना अटक करण्यात आली आहे. उघडपणे द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्या महंताच्या विरोधात मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन केले. घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांनी महंत यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. आता पोलिसांनी बजरंग मुनींना सीतापूर येथून अटक केली आहे.UP Police arrests mahant for threatening to rape Muslim women


    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक मिरवणुकीत मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी महंत बजरंग मुनिदास यांना अटक करण्यात आली आहे. उघडपणे द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्या महंताच्या विरोधात मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन केले. घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांनी महंत यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. आता पोलिसांनी बजरंग मुनींना सीतापूर येथून अटक केली आहे.

    काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात सोशल मीडियावर द्वेषपूर्ण भाषणाचे प्रकरण समोर आले होते. ज्यामध्ये खैराबादी स्थित बडी संगतचे महंत बजरंग मुनी दास द्वेषपूर्ण भाषण देताना दिसले. व्हिडिओमध्ये महंत बजरंग मुनी दास मुस्लिम महिलांबद्दल अपशब्द वापरताना दिसत होते. त्यामुळे त्यांचा विरोध तीव्र झाला.



    सध्या मुस्लीम महिलांनी द्वेषपूर्ण भाषणावरून महंतांच्या विरोधात धरणे आंदोलन केले. त्याचवेळी राष्ट्रीय महिला आयोगाने 1 आठवड्याच्या आत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. सध्या सीतापूर जिल्ह्यातील कमलापूर ब्लॉक कसमांडा सीएचसी येथे बजरंग मुनी दास यांचे मेडिकल करण्यात आले आहे.

    व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी एका विशिष्ट समुदायाच्या महिला आणि मुलींवर जमावासमोर घराबाहेर बलात्कार करण्याबाबत बोलत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. ‘Zoo Bear’ नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत एफआयआर नोंदवला.

    UP Police arrests mahant for threatening to rape Muslim women

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!