• Download App
    लखनऊत तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या सपा नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले । UP Elections Attempted self-immolation of an angry SP leader by not getting a ticket in Lucknow, police rescued

    लखनऊत तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या सपा नेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले

    UP Elections :  उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांमध्ये तिकीटावरून चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अलिगढच्या आदित्य ठाकूर यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. अलिगडच्या छारामधून निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने त्यांना कसेबसे वाचवले. UP Elections Attempted self-immolation of an angry SP leader by not getting a ticket in Lucknow, police rescued


    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांमध्ये तिकीटावरून चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अलिगढच्या आदित्य ठाकूर यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. अलिगडच्या छारामधून निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने त्यांना कसेबसे वाचवले.

    दुसरीकडे, आता विविध माध्यमांतून असे वृत्त येत आहे की, मुलायम सिंह यांच्या धाकट्या स्नूषा अपर्णा यादव भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णा यांची भाजपसोबतची चर्चा अंतिम झाली आहे. अपर्णा यादव यांनी 2017 ची विधानसभा निवडणूक लखनऊच्या कँट मतदारसंघातून लढवली होती. अपर्णा यादव 2017 च्या विधानसभा निवडणुकीत कँट विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर होत्या. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, अपर्णा यांना सुमारे 63 हजार मते मिळाली. अपर्णा यादव या मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत.

    यूपीमध्ये 7 टप्प्यांत निवडणुका होणार आहेत, पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च आणि सातवा टप्पा 7 मार्चला होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत.

    UP Elections Attempted self-immolation of an angry SP leader by not getting a ticket in Lucknow, police rescued

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे