• Download App
    UP Elections 2022 : बसपाला मोठा धक्का, 6 नेत्यांचा सपामध्ये प्रवेश, एक भाजप आमदारही सायकलवर स्वार । UP Elections 2022 Six BSP Leaders and BJP MLA Join Samajwadi Party

    UP Elections 2022 : बसपाला मोठा धक्का, 6 नेत्यांचा सपामध्ये प्रवेश, एक भाजप आमदारही सायकलवर स्वार

    यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपाला मोठा झटका बसला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी शनिवारी सपामध्ये प्रवेश केला. अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे. हे आमदार बराच काळ अखिलेश यांच्या संपर्कात होते. त्याचवेळी भाजपच्या एका आमदारानेही सपाचे सदस्यत्व घेतले. UP Elections 2022 Six BSP Leaders and BJP MLA Join Samajwadi Party


    वृत्तसंस्था

    लखनऊ : यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपाला मोठा झटका बसला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी शनिवारी सपामध्ये प्रवेश केला. अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे. हे आमदार बराच काळ अखिलेश यांच्या संपर्कात होते. त्याचवेळी भाजपच्या एका आमदारानेही सपाचे सदस्यत्व घेतले.

    यूपी निवडणुकीपूर्वी बसपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, सपा हा भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास येत आहे आणि मजबूत होताना दिसत आहे.



    अखिलेश यादव यांनी बसपा आणि भाजपच्या आमदारांचे सपा कार्यालयात स्वागत केले आणि त्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, सपामध्ये येऊ इच्छिणारे अनेक लोक आहेत. निवडणुका येईपर्यंत भाजप हे ‘भागता परिवार’ राहील. या निवडणुकीत भाजपचा सफाया होण्याची खात्री आहे. भाजपने शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. ना त्याचे उत्पन्न दुप्पट झाले, ना त्याचे जीवन सुधारण्याचे प्रयत्न झाले,” असेही ते म्हणाले.

    कोण-कोण झाले सपामध्ये सामील?

    बादशाहपूर, जौनपूरच्या सुषमा पटेल मुंगरा, सिधौली, सीतापूरचे हरगोविंद भार्गव, धौलाना, हापूडचे अस्लम चौधरी, श्रावस्तीचे अस्लम रैनी, हंडिया, प्रयागराजचे हकीम लाल बिंद, प्रतापपूर प्रयागराजचे मुजतबा सिद्दीकी तसेच भाजपचे सीतापूर सदरचे आमदार राकेश राठोड सपामध्ये दाखल झाले आहेत.

    UP Elections 2022 Six BSP Leaders and BJP MLA Join Samajwadi Party

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य