UP Elections : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यादरम्यान पक्षांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठीचे उमेदवारही जाहीर केले आहेत. दरम्यान, बदायूं जिल्ह्यातील शेखुपर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार फराह नईम या पत्रकार परिषदेत ढसाढसा रडल्या. त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओंकार सिंग यांच्यावर छेडछाड आणि अभद्र वर्तणुकीचा आरोप करत निवडणूक लढवण्यास नकार दिला. या जिल्हाध्यक्षपदाखाली मी निवडणूक लढवू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. असहाय होऊन त्यांनी थेट काँग्रेसचा राजीनामाच जाहीर केला आहे. UP Elections Congress woman candidate accuses district president of harassing, refuses to contest elections
प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यादरम्यान पक्षांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठीचे उमेदवारही जाहीर केले आहेत. दरम्यान, बदायूं जिल्ह्यातील शेखुपर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार फराह नईम या पत्रकार परिषदेत ढसाढसा रडल्या. त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओंकार सिंग यांच्यावर छेडछाड आणि अभद्र वर्तणुकीचा आरोप करत निवडणूक लढवण्यास नकार दिला. या जिल्हाध्यक्षपदाखाली मी निवडणूक लढवू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. असहाय होऊन त्यांनी थेट काँग्रेसचा राजीनामाच जाहीर केला आहे.
खरे तर काँग्रेसच्या तिसर्या यादीत फराह नईम यांचे नावही तिकीट देण्यात आलेल्या महिलांमध्ये आहे. मात्र, त्यांनी रडत रडत काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून झालेल्या छळाची माहिती देत गंभीर आरोप केले आहेत. जिल्हाध्यक्षांवर अभद्रता आणि छळवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाचा राजीनामाही जाहीर केला आहे.
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. पक्षाने 89 उमेदवारांच्या यादीत 37 महिलांना उमेदवारी दिली आहे. म्हणजेच दुसऱ्या यादीप्रमाणे या यादीतही महिलांचा वाटा ४० टक्के आहे.
काँग्रेसने उत्तर प्रदेशात आतापर्यंत एकूण 255 उमेदवार जाहीर केले असून त्यात एकूण 103 महिलांना तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीनुसार बेहटमधून पूनम कंबोज, बिजनौरमधून अकबरी बेगम, नूरपूरमधून बालादेवी सैनी आणि हाथरसमधून सरोज देवी यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय अनेक महिलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या पक्षाच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी ‘लडकी हूं, लड सकती हूं’ मोहीम सुरू करताना विधानसभा निवडणुकीत 40 टक्के तिकिटे महिलांना दिली जातील, अशी घोषणा केली होती. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार आहे, तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 7 मार्चला होणार आहे. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
UP Elections Congress woman candidate accuses district president of harassing, refuses to contest elections
महत्त्वाच्या बातम्या
- आता कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार, काय असणार किंमत, वाचा सविस्तर…
- मंत्रालयांनी कसे केले कचऱ्याचे कॅफेटेरिया अन् वेलनेस सेंटर्समध्ये रूपांतर, अशी स्वच्छता मोहीम जिने प्रशासकीय कामात सौंदर्य भरले
- प्रजासत्ताक दिनी दिल्लीत तरुणीवर सामूहिक बलात्कार, महिलांनीच पीडितेचे केस कापले, गळ्यात चपलाची माळ टाकून तोंडाला फासले काळे
- श्वेता तिवारी म्हणाली, माझ्या ब्रा ची साईज देवच मोजत आहे, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
- महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जबरदस्त धक्का, मालेगावच्या नगराध्यक्षांसह 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश