UP Election : शिवसेना खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी यूपी निवडणुकीबाबत भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, आता मोठ्या राज्यातही मंत्री आणि आमदार भाजपपासून अंतर ठेवू लागले आहेत. यूपीमध्ये ही सुरुवात आहे आणि पुढेही होत राहील. पक्षाचे मंत्री, आमदार निघून जात आहेत. UP Election 2022 Shiv Sena to contest at least 50 seats in UP, says Sanjay Raut – Wave of change in UP
वृत्तसंस्था
लखनऊ : शिवसेना खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी यूपी निवडणुकीबाबत भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, आता मोठ्या राज्यातही मंत्री आणि आमदार भाजपपासून अंतर ठेवू लागले आहेत. यूपीमध्ये ही सुरुवात आहे आणि पुढेही होत राहील. पक्षाचे मंत्री, आमदार निघून जात आहेत.
लोक स्वामी प्रसाद मौर्य यांच्याबद्दल सांगतात की त्यांना वाऱ्याची दिशा माहिती आहे. ते पराभूत पक्षात राहत नाहीत. ते ओबीसींचे मोठे नेते आहेत. संजय राऊत म्हणाले की, यूपी परिवर्तनाच्या मार्गावर आहे.
यूपीत मंत्री-आमदारांची भाजपला सोडचिठ्ठी
शिवसेना नेते संजय राऊत पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश वाचवायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. समाजवादी पक्षाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही सोबत घ्यावे. यूपीमध्ये परिवर्तनाची लाट आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनेही मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात शिवसेना 50 ते 100 जागा लढवणार असल्याचा दावा त्यांनी केला.
यूपी आणि गोव्यात बदल निश्चित : संजय राऊत
यासोबतच विधानसभा निवडणुकीबाबत ओपिनियन पोलच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र त्यावर विश्वास ठेवण्याची गरज नसल्याचे संजय राऊत म्हणाले. उत्तर प्रदेश आणि गोव्यात यावेळी बदल निश्चित असल्याने भाजपने सावध राहण्याची गरज आहे. शरद पवार यांच्यासोबत समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे लवकरच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाऊ शकतात. पाचपैकी तीन राज्यांत राष्ट्रवादीही निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
UP Election 2022 Shiv Sena to contest at least 50 seats in UP, says Sanjay Raut – Wave of change in UP
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अटकेचे वॉरंट जारी, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी न्यायालयाचा आदेश
- Weather Alert : महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरात पारा शून्यावर, दोन-तीन दिवसांत अवकाळीचीही शक्यता
- बळीराजासाठी आनंदाची बातमी : कापूस पोहचला साडेदहा हजार रुपये क्विंटलवर; पन्नास वर्षांतील विक्रमी भाव
- Sri Lanka Inflation : श्रीलंकेत महागाईचा कडेलोट, टोमॅटो 200 रुपये किलो, मिरची 700 च्या पुढे, परकीय चलनसाठ्यातही मोठी घसरण
- India-China Military Talks : भारत आणि चीनमध्ये लष्करी चर्चेची 14वी फेरी सुरू, 20 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष सोडवण्यावर भर