• Download App
    तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी योगी आदित्यनाथ यांची तयारी सुरु, सर्व जिल्ह्यांत मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड|UP CM Yogi starts planning for third wave

    तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी योगी आदित्यनाथ यांची तयारी सुरु, सर्व जिल्ह्यांत मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्याची उत्तर प्रदेशात सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र आयसीयू कोव्हिड वॉर्ड तयार करण्यात येणार आहेत.UP CM Yogi starts planning for third wave

    तसेच मुलांसाठी स्वतंत्र विभागही जिल्हा रुग्णालयांत असतील.तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी ग्रामीण भागातील कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाची लक्षणे दिसल्यास लगेच कोरोनावरील औषधे देण्यात येतील.



    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुढील उपाययोजनांबाबत माहिती दिली. म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढत आहेत, या रुग्णांच्या उपचारांसाठीही जिल्हा रुग्णालयांत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ३० ते ५० पटींनी वाढल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले. तसेच उद्यापासून २३ जिल्ह्यांमध्ये १८ वर्षांपुढील तरुणांचे लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

    UP CM Yogi starts planning for third wave

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी

    Disha Patani : दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे ठार; गाझियाबादेत एसटीएफने केले एन्काउंटर