विशेष प्रतिनिधी
गाझीपूर – हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातून जादा पाणी सोडल्याने उत्तर प्रदेशात पूर आला आहे असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.त्यानी गाझीपूरच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.UP CM Yogi Aditynath targets Haryana, MP, Rajasthan for flood situation
आशिया खंडातील सर्वात मोठे खेडे गहमर येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्त १८२ कुटुंबीयांना मदत साहित्य दिले. दरम्यान, यमुना आणि बेतवा नदीला आलेल्या पुरामुळे शंभर गावे पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत. पूरग्रस्त भागात पोलिस अधीक्षकांनी नौकेतून पाहणी केली आणि खाद्यसामग्री पोचवली.
यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, की २४ तहसीलतंर्गत ६२० गावांना पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून पीडितांना मदत पोचवली जात आहे. आमदारांनी लोकांशी भेटून त्यांच्या समस्या दूर कराव्यात, असे आवाहन केले. पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे आदित्यनाथ म्हणाले.
UP CM Yogi Aditynath targets Haryana, MP, Rajasthan for flood situation
महत्त्वाच्या बातम्या
- देशात अजूनही २५ कोटी लोकसंख्या शिक्षण व्यवस्थेच्या बाहेरच – धर्मेंद्र प्रधान यांचे झणझणीत अंजन
- लसीकरणात आघाडी : भारताची चिंता असलेल्या जागतिक माध्यमांनी भारताचे यशही दाखवावे, आनंद महिंद्रा यांनी सुनावले
- निवडणूक आयोगाची वेबसाईट हॅक करून बनविली १० हजारांवर बनावट ओळखपत्रे, उत्तर प्रदेशातील तरुणाला अटक
- तामीळनाडू सरकारने पेट्रालच्या किंमती तीन रुपयांनी केल्या कमी, अर्थसंकल्पात करात केली कपात