प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपने 275 जागा मिळवत प्रचंड बहुमताने सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली असताना राज्यात नवनव्या घोषणा दिल्या जात आहेत. बुलडोजर बाबा आये है!!… मशीन वही तकनीक नई…!! अशा या घोषणा आहेत.UP Assembly Election Result
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी बुलडोजर चालवून माफियागिरी अक्षरश: मोडून काढली. परंतु, ते काम पाच वर्षात पूर्ण झालेले नाही. अजून काही काम बाकी आहे. त्यामुळे त्यांनी आपली बुलडोजर बाबा ही प्रतिमा कायम ठेवत आम्हाला अजून माफियागिरीची सफाई करण्यासाठी संधी द्या, असा प्रचार केला होता. राज्यातल्या जनतेने हा प्रचार स्वीकारून योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा संधी दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोजर बाबा आये है!!, मशीन वही तकनिक नई…!! अशा स्वरूपाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आहे.
मात्र, फक्त बुलडोजर बाबाची जादू चालली असे नाही तर विकासाच्या विविध मुद्द्यांवर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने साकारला आहे.
- माफियागिरी मोडली
- 2017 मध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ यांनी यूपीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर गुन्हेगारीचा आलेख कमी होऊ लागला.
- गेल्या पाच वर्षांत माफियांची कोट्यवधींची मालमत्ताही जप्त करण्यात आली. बाहुबली लीडर मुन्ना बजरंगीवर केलेल्या जबर कारवाईने माफीया हादरले.
- समाजवादी पक्षाची प्रतिमा डागाळली. उत्तर प्रदेशात योगी सरकारसमोर समाजवादी पक्ष सर्वात मोठा विरोधीपक्ष होता. परंतु, गुन्हेगारीला मुक पाठिंबा असल्याची आपली प्रतिमा ते सुधारू शकले नाही. त्याचा परिणाम या निवडणुकीतही दिसला.
- युपीमध्ये नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अजूही कायम आहे असे दिसून येत आहे. यूपीमध्ये भाजपच्या विजयाचे हेही सर्वात मोठे कारण आहे. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी पीएम मोदींनी युपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रॅली काढल्या. त्यांच्या रॅलीला मिळणारा प्रतिसाद पाहता भाजपच्या विजयाचा विश्वास बळावला होता.
- उत्तर प्रदेशात पायाभूत सुविधांपासून ते कायदा आणि सुव्यवस्थेपर्यंत झालेली कामे आणि घेतलेले निर्णय लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. आरोग्य क्षेत्रातही योगी सरकारने अनेक अभूतपूर्व कामे केली आहेत. 59 जिल्ह्यांमध्ये किमान 1 वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आले.
- 16 जिल्ह्यांमध्ये पीपीपी मॉडेलवर वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोरखपूर, रायबरेली एम्सचे कामकाज सुरू झाले आहे. महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ, गोरखपूरचे बांधकाम सुरू झाले आहे. पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत 6 कोटी 47 लाखांहून अधिक लोकांना विमा संरक्षण मिळाले आहे.
- 42.19 लाख लोकांना मुख्यमंत्री जन आरोग्य योजनेचे विमा संरक्षण.
- लखनौमध्ये अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठाचे बांधकाम सुरू असून, ६ नवीन सुपर स्पेशालिटी मेडिकल ब्लॉक्सची स्थापना. राज्यभरात ४४७० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. ९५१२ डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफची नियमित/कंत्राटीवर भरती करण्यात आली आहे. डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे केले.
- उत्तर प्रदेशात रस्त्यांचे जाळे. 14,471 किमी रस्ता रुंदीकरण/मजबुतीकरण.
- 15,286 किमी नवीन रस्त्यांचे बांधकाम आणि 925 लहान आणि मोठे पुलांचे बांधकाम पूर्ण.
- 124 लांब पूल, 54 रेल्वे उड्डाणपूल पूर्ण, 355 लहान पूल प्रगतीपथावर.
- तहसील मुख्यालय आणि ब्लॉक मुख्यालय यांना दोन लेन रस्त्याने जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
- राज्याच्या सीमेला लागून असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सीमेला जोडणाऱ्या ८२ रस्त्यांसाठी १७५९ कोटी रुपये खर्चून ९२९ किमी लांबीचे काम प्रगतीपथावर आहे.
- नोएडा, लखनौ, गाझियाबाद, कानपूर, आग्रा, मेरठ, गोरखपूर, वाराणसी, प्रयागराज आणि झाशी येथे 10 मेट्रो रेल्वे प्रकल्प.
- योगी सरकारचं शेतकऱ्यांच्या हितासाठी काम
- 86 लाख शेतकऱ्यांची 36 हजार कोटींची कर्जमाफी.
- ऊस शेतकऱ्यांनी 1.44 लाख कोटींहून अधिक उसाला भाव. 476 लाख मेट्रिक टन साखरेचे विक्रमी उत्पादन
- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन कोटी 53 लाख 98 हजार शेतकऱ्यांना 37,388 कोटी रुपये हस्तांतरित
- 2399 लाख मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादन
- पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना 2376 कोटींची भरपाई. शेतकऱ्यांना ४ लाख ७२ हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज दिले.
- 45 कृषी उत्पादन बाजार शुल्क मुक्त. मंडी फी एक टक्क्याने कमी. 220 मंडयांचे आधुनिकीकरण. 291 ई नाम मंडीची स्थापना.
UP Assembly Election Result
महत्त्वाच्या बातम्या
- U. P. Elections : उत्तर प्रदेशात योगींच्या नेतृत्वाखाली भाजपचा दणदणीत विजय; खुसपटी विश्लेषकांची चर्चा “दमदार” विरोधी पक्षाची…!!
- काॅंग्रेस,समाजवादी पक्षाला लोकांनी नाकारले; यूपीमध्ये भाजप 260 जागांवर आघाडीवर
- Goa Shivsena – Congress : गोव्यात प्रत्यक्षात भाजपला बहुमत; पण संजय राऊत चिदंबरमना म्हणाले, तुम्हाला सहकार्य करू!!
- Manipur AssemblyElections 2022 Result : माणि