वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : भारतातील शेकडो कामगारांना आमिष दाखवत अमेरिकेत आणत त्यांना येथील मंदिर निर्माणाच्या कामासाठी कमी वेतनावर जुंपल्याचा आरोप येथील अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेवर झाला असून त्याबाबत खटलाही दाखल झाला आहे. Unrest in temple labors in USA
न्यूजर्सी येथे उभारण्यात येत असलेल्या स्वामीनारायण मंदिराच्या बांधकामावर प्रति तास एक डॉलर या वेतनावर काम करण्याची बळजबरी त्यांच्यावर केली जात असल्याची आणि बांधकामाच्या ठिकाणीच डांबून ठेवण्यात आल्याची या कामगारांची तक्रार आहे.
अमेरिकेत कामगारांना दर तासाला किमान ७.२५ डॉलर इतके वेतन देण्याचा कायदा आहे. या खटल्यात गेल्याच महिन्यात सुधारणा करत स्वामीनारायण संस्थेने अटलांटा, शिकागो, ह्युस्टन आणि लॉस एंजेलिस येथेही मंदिर उभारणीसाठी भारतातून कामगार आणले असून त्यांना महिन्याला केवळ ४५० डॉलर वेतन दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अशा प्रकारे शेकडो कामगारांचे शोषण झाले असल्याचे या खटल्यात म्हटले आहे. येथील इंडिया सिव्हील वॉच इंटरनॅशनल या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एफबीआय या अमेरिकेच्या तपास संस्थेने मे महिन्यात छापा घालत सुमारे दोनशे कामगारांची सुटकाही केली होती. स्वामीनारायण संस्थेने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
Unrest in temple labors in USA
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी