भारताचे दिग्गज माजी धावपटू मिल्खा सिंग यांचा पत्नीच्या मृत्यूनंतर पाच दिवसांतच मृत्यू झाला. भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधारी निर्मला कौर यांच्यासोबतची मिल्खासिंग यांची प्रेमकहानीही अनोखी आहे. त्यांच्या लग्नासाठी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.Unique love story, marriage between Milkha Singh and Nirmala Kaur mediated by Punjab Chief Minister
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे दिग्गज माजी धावपटू मिल्खा सिंग यांचा पत्नीच्या मृत्यूनंतर पाच दिवसांतच मृत्यू झाला. भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधारी निर्मला कौर यांच्यासोबतची मिल्खासिंग यांची प्रेमकहानीही अनोखी आहे. त्यांच्या लग्नासाठी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.
मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली भेट खेळाच्या मैदानावरच झाली. याआधी मिल्खा सिंग यांचे अनेक मुलींसोबतच्या प्रेमाच्या चचार्ही गाजल्या होत्या. त्यांच्या प्रेमाचे किस्सेही चर्चिले गेले होते. मात्र, यापैकी कुणाशीही त्यांचं लग्न झालं नाही. कारण त्यांचे मन निर्मला कौर यांच्यावर जडले होते.
मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली भेट 1955 रोजी कोलंबोला झाली होती. तेथे एका उद्योगपतीने भारतीय खेळाडूंसाठी डिनर आयोजित केले होते. तेथेच दोघांची एकमेकांशी ओळख झाली. मिल्खा सिंग पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले. तेव्हा त्यांनी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला.
पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघे पुन्हा भेटले. मात्र, त्यांच्या प्रेमाच्या गाडीने 1960 मध्ये वेग पकडला. तेव्हा दोघांची भेट दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठे नाव बनले होते. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचे प्रेम वाढत् गेले.
मात्र, दोघांच्या लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरच्यांचा विरोध होता. निर्मला कौर या हिंदू आणि मिल्खा सिंग शिख असल्यानं निर्मला कौर यांच्या वडिलांचा त्याला विरोध होता. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा आला. यावेळी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.
Unique love story, marriage between Milkha Singh and Nirmala Kaur mediated by Punjab Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या
- मुकुल रॉय यांची आमदारकी धोक्यात, शुभेंदू अधिकारींचा विधानसभा अध्यक्षांना अर्ज, पक्षबदल कायद्यान्वये कारवाईची मागणी
- स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने रचला इतिहास रचला, इन्स्टाग्रामवर 300 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला सेलिब्रिटी
- भुजबळ, पटोले, वडेट्टीवार हे तर ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार; आशिष शेलारांची सडकून टीका
- जात प्रमाणपत्र हायकोर्टातून रद्द झाल्यानंतर नवनीत राणांची खासदारकी धोक्यात, सर्वोच्च न्यायालयात धाव
- फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यातील 10 महापालिका, 20 नगर परिषदांच्या निवडणुकीची शक्यता