• Download App
    केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा निघाली; संजय राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती घातली; हरदीप सिंग पूरींनी प्रत्युत्तर दिले!!|Union ministers launch Jan Ashirwad Yatra; Sanjay Raut feared a third wave of corona; Hardeep Singh Puri replied !!

    केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा निघाली; संजय राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती घातली; हरदीप सिंग पूरींनी प्रत्युत्तर दिले!!

    वृत्तसंस्था

    मुंबई / नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या ध्येय धोरणांची माहिती देशातील जनतेला देण्यासाठी वीस 20 मंत्र्यांनी संपूर्ण देशभरात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्रातल्या चार मंत्र्यांचाही त्यात समावेश आहे. ही जन आशीर्वाद यात्रा सुरू होताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे.Union ministers launch Jan Ashirwad Yatra; Sanjay Raut feared a third wave of corona; Hardeep Singh Puri replied !!

    या केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा होईल. त्यामुळे लोकांची झुंबड उडेल. पण त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची तिसरीला येऊ शकते, असा इशारा त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिला.संजय राऊत यांच्या या वक्तव्याची दखल केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्लीत घेतली. ते म्हणाले, की संजय राऊत यांना सांगा, की मी त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. परंतु आम्ही मंत्री केंद्र सरकारची धोरणे ध्येयधोरणे देशातल्या जनतेला सांगितल्यावाचून राहणार नाही. सरकारची धोरणे जाणून घेण्याचा आणि आम्हाला प्रश्न विचारण्याचा या देशातल्या जनतेला अधिकार आहे.



    त्यापासून जनतेला आम्ही वंचित ठेवू इच्छित नाही. परंतु हे त्यांनी लक्षात ठेवावे, जे मास्क न वापरता राज्यसभेच्या सदनात गोंधळ घालत होते. टेबलवर चढून आरोळ्या देत होते आणि ज्यांनी सदनाचा शिस्तभंग केलेला आहे, हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा हा अशा गदारोळ नेत्यांना संजय राऊत यांनी दिला पाहिजे, असा टोला हरदीपसिंग पुरी यांनी लगावला.

    मेट्रोचे उद्घाटन, राष्ट्रवादी कार्यालयातील गर्दी

    आज जन आशीर्वाद यात्रेवरून संजय राऊत जरी कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेची भीती घालत असले तरी काहीच दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसैनिकांच्या आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या गर्दीत मेट्रोचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी कोणीही सोशल डिस्टंसिंग पाळलेले नव्हते.

    त्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी कोरोना निर्बंध लागू असताना देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तेथे देखील कोरोनाचे कोणतेही नियम पाळण्यात आले नव्हते. त्यावेळी अजित पवारांना कोरोना नियमावली संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी चूक झाल्याची कबुली दिली होती.

    परंतु त्यानंतरही महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी होताना दिसते आहे. महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करून संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्र्यांना जन आशीर्वाद यात्रेवरून टार्गेट केले आहे.

    Union ministers launch Jan Ashirwad Yatra; Sanjay Raut feared a third wave of corona; Hardeep Singh Puri replied !!

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही