• Download App
    मुलीच्या लग्नासाठी वृद्ध महिलेची मैदान मोकळं करून देण्याची विनंती, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी स्वत: हातात फावडे घेऊन केली स्वच्छता|Union Minister Smriti Irani cleans shovels in old woman's request to clear ground for daughter's wedding

    मुलीच्या लग्नासाठी वृद्ध महिलेची मैदान मोकळं करून देण्याची विनंती, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी स्वत; हातात फावडे घेऊन केली स्वच्छता

    प्रतिनिधी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी स्वत:च्या हातांनी फावड्याने शेणाचा ढीग साफ केला. स्मृती इराणींना मैदानावरील शेण हटवताना पाहून उपस्थित भाजप नेतेही कामाला लागले. यामुळे सुमारे 30 मिनिटांत एक ट्रॉली शेणाचा ढीग साफ झाला. या कामामुळे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.Union Minister Smriti Irani cleans shovels in old woman’s request to clear ground for daughter’s wedding


    वृद्ध महिलेने केली होती विनंती

    स्मृती इराणी मंगळवारी भीम नगर सिग बरवा येथे स्वच्छता मोहिमेसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी परिसरातील एका वृद्ध महिलेने स्मृती इराणी यांना आपल्या मुलीचे घरासमोरील मैदानात लग्न लावणार असल्याचे सांगितले. काही गोपालकांनी त्या ठिकाणी शेणाचा ढीग जमा केला आहे. तो हटवावा, अशी विनंती केली होती.

    स्मृती इराणी म्हणाल्या- चांगल्या कामात विलंब कसा?

    वयोवृद्ध महिलेचे बोलणे ऐकून स्मृती इराणी म्हणाल्या की शुभ कार्यात विलंब कशाला? आम्ही मिळून शेणाचा ढीग हटवतो. यानंतर स्मृती इराणी यांनी स्वत: हातात फावडे घेतले आणि शेणाचा ढीग हटवायला लागल्या. त्यांना शेण हटवताना पाहून त्यांच्यासह उपस्थित भाजपचे नेते व कार्यकर्तेही पुढे आले. अनेक महिन्यांपासून साचलेला शेणाचा ढीग अवघ्या काही मिनिटांत साफ झाला.

    Union Minister Smriti Irani cleans shovels in old woman’s request to clear ground for daughter’s wedding

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता