अखिलेश यादव यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानावरून भाजपा नेतेही इंडिया आघाडीवर निशाणा साधत आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच विरोधकांच्या इंडिया आघाडीत मतभेद सुरू झाल्याचे दिसत आहे. यापूर्वीही अनेक प्रसंगी त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यात विरोधाभास दिसून आला आहे. मात्र आता निवडणूक प्रचारादरम्यान ते उघडपणे समोर येत आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या वक्तव्याने याला आणखी चालना मिळाली आहे. त्याचवेळी भाजपा या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत आहे. Union Minister Ramdas Athawale targeted India Aghadi
समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानावर भाजपा नेत्यांच्या सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही यावरून खरपूस समाचार घेतला आणि म्हटले की, ‘अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत आणि ते I-N-D-I-A आघाडीचे महत्त्वाचे भागीदार आहेत. काही राज्यांमध्येही समाजवादी पार्टीही काम करते. त्यांनी काँग्रेसला म्हटले होते की त्यांना काही जागा मिळायला हव्यात, मात्र काँग्रेसने यास नकार दिला.
रामदास आठवले पुढे म्हणाले की, “काँग्रेसच्या या निर्णयामुळे अखिलेश संतापले असून, आगामी काळात इंडिया आघाडीत मोठी फूट पडण्याची मला शंका आहे. यातून अनेक पक्ष बाहेरही येऊ शकतात. जागावाटपातच एकता साधली जात नाही, तर पुढे काय होणार? पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी स्थापन केलेली ही आघाडी स्वतःच पराभूत होईल, असा टोला आठवले यांनी लगावला.
काय म्हणाले अखिलेश यादव? –
मध्य प्रदेशातील जागावाटपाच्या मुद्द्यावर अखिलेश यादव म्हणाले की, आम्हाला आश्वासन देण्यात आले होते की आम्ही 6 जागांवर विचार करू, पण जेव्हा जागा जाहीर झाल्या तेव्हा समाजवादी पक्षाला शून्य जागा मिळाल्या. विधानसभेच्या पातळीवर इंडिया आघाडीची युती नाही हे मला पहिल्याच दिवशी कळले असते, तर आपण तिथे कधीच भेटायला गेलो नसतो, ना समाजवादी पक्षाच्या लोकांनी आपली यादी काँग्रेसला दिली असती, ना काँग्रेसच्या लोकांचे फोन उचलले असते . मात्र त्यांनी जर हे म्हटले आहे की आघाडी नाही, तर आम्ही हे स्वीकार करतो की आघाडी नाही. आघाडी फक्त उत्तर प्रदेशात केंद्रासाठी असेल तर विचार केला जाईल. समाजवादी पक्षाला जशी वागणूक मिळते तशीच त्यांना वागणूक मिळेल.”
Union Minister Ramdas Athawale targeted India Aghadi
महत्वाच्या बातम्या
- झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती
- मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन, प्रत्येक केंद्रात १०० तरुणांना मिळणार प्रशिक्षण
- पवारांचा पॅलेस्टिनींना पाठिंबा; पवार आता सुप्रियांनाच हमासच्या बाजूने लढायला पाठवतील; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा टोला!!
- WATCH : कर्नाटकात काँग्रेस मंत्र्यांच्या उपस्थितीत हवेत उडवल्या नोटा; भाजपची टीका- जनतेच्या लुटलेल्या पैशांनी