जम्मू-काश्मीर खोऱ्यात मागील काही दिवासांपासून दहशतवाद्यांच्या कुरापती वाढल्या आहेत आणि चकमकीही सुरू आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराचे ऑपरेशन सुरू आहे. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात गेल्या पाच दिवसांपासून चकमक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भारताच्या शत्रूंना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ”भारताला युद्ध नकोय, पण जर तुम्ही काही चुकीचे केलेच तर तुमच्या मुलांना इतर कोणी वाढवेल.” Union Minister Rajeev Chandrasekhars warning to Indias enemies
गेल्या मंगळवारी अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये दहशतवादी लपल्याची बातमी आली होती. तेव्हापासून भारतीय लष्कर आणि लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले. लष्कर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे.
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट केले की, “भारताचे शत्रू आहेत. या शत्रूंना भारताचा विकास थांबवायचा आहे. पण भारतीय लष्कर आधुनिक आणि प्राणघातक शस्त्रांनी सुसज्ज आहे, हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे. काही चुका केल्या नाहीत तरच बरे होईल. भारतापासून दूर राहणेच त्यांच्यासाठी शहाणपणाचे ठरेल. हा नवा भारत आहे, घाबरणार नाही आणि मागे हटणार नाही. भारताने युद्ध पाहिले आहे आणि भारताला युद्ध नकोय, पण जर तुम्ही भारताशी युद्ध केले तर तुमच्या मुलांना कोणीतरी दुसरं वाढवेल.”
Union Minister Rajeev Chandrasekhars warning to Indias enemies
महत्वाच्या बातम्या
- अमृता देशमुख चा होणाऱ्या नवऱ्यासाठी खास उखाणा! समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल
- ”जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी आहे, ते कधीच…” अमित शाह यांचे विधान!
- बहुजनांनी तुम्हा उच्चवर्णीयांसाठी फक्त बलिदानच द्यायचे का??; सुजात आंबेडकरांनी रोहित पवारांना फटकारले
- लष्कराने घेतला हौतात्म्याचा बदला, बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; अनंतनागमध्येही कारवाई सुरूच