• Download App
    केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल यांचा वाहनाला अपघात; तीन जखमी, एकाचा मृत्यू ; जाणून घ्या कसा घडला अपघात? Union Minister Pralhad Patel's vehicle accident Three injured one killed

    केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल यांचा वाहनाला अपघात; तीन जखमी, एकाचा मृत्यू ; जाणून घ्या कसा घडला अपघात?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. यावेळी अपघातात एकाचा मृत्यू झाला. पटेल यांच्यासह तीन जण जखमी झाले. पटेल यांच्या कारला नरसिंगपूरजवळ अपघात झाला. त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. Union Minister Pralhad Patel’s vehicle accident Three injured one killed

    अमरवाडा पोलीस स्टेशन हद्दीजवळ सिंगोडी बायपासवर हा अपघात झाला. पटेल छिंदवाडाहून नरसिंगपूरच्या दिशेने जात होते. यादरम्यान वाटेत एक दुचाकी अचानक समोर आली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पटेल यांची गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावर उलटली.

    यामध्ये एका बालकाचा मृत्यू झाला असून कारचे पूर्ण नुकसान झाले. पटेल यांच्यासोबत कारमध्ये उपस्थित असलेले लोक जखमी झाले .पटेल यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

    Union Minister Pralhad Patel’s vehicle accident Three injured one killed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे