मुख्यमंत्री योगी उत्तर प्रदेशात रामराज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले.
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : Nitin Gadkari केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या विकासकामांवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जाहीर कौतुक केले आहे. गडकरी म्हणाले, उत्तर प्रदेशला भारतातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या संकल्पाने, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पायाभूत सुविधांच्या विकासावर सतत भर देत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आता देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या आघाडीच्या राज्यांपैकी एक बनले आहे.Nitin Gadkari
तसेच गडकरी हे देखील म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात रामराज्य स्थापन करण्यात यश मिळवले आहे. लखनऊमध्ये आयोजित १०२८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमात ते जनतेला संबोधित करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वगुरू आणि ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे आणि यामध्ये उत्तर प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावेल. रस्ते, पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि दळणवळणाच्या व्यवस्था मजबूत केल्यास उद्योगांना चालना मिळेल, भांडवली गुंतवणूक आकर्षित होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील यावरही यावेळी गडकरी यांनी भर दिला.
केंद्रीयमंत्री गडकरींनी सांगितले की, अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये लॉजिस्टिक्स खर्च १२ टक्के आणि चीनमध्ये ८ टक्के आहे, तर भारतात पूर्वी तो १६ टक्के होता. पण मोदी सरकारने ते ९ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दीड पटीने चालना मिळेल आणि कोट्यवधी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
Union Minister Nitin Gadkari publicly praised Chief Minister Yogi
महत्वाच्या बातम्या
- Harshawardhan Sapkal ओसाड माळावरच्या जहागिरीला… म्हणून सपकाळ याना बसविले घोड्यावर
- Mahadev Munde बीडमध्ये आणखी एक एसआयटी, महादेव मुंडे खून प्रकरणी तपासासाठी विशेष पथक
- Mohammad Yunus : मोहम्मद युनूस सरकारच्या काळात हिंदूंना केले गेले लक्ष्य!
- रेस मधली चार बडी नावे बाजूला सारून हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष!!