प्रसाद यांच्यासह त्यांचा स्वयंपाकी आणि पर्सनल सेक्रेटरीही जखमी झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
पिलीभीत: केंद्रीय मंत्री आणि खासदार जितिन प्रसाद हे रस्ते अपघातात जखमी झाले आहेत. केंद्रीय मंत्री पिलीभीत लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. जितीन प्रसाद यांच्या ताफ्याचे वाहन दुसऱ्या वाहनाला धडकले. प्रसाद यांच्यासह त्यांचा स्वयंपाकी आणि पर्सनल सेक्रेटरीही जखमी झाले आहेत.Union Minister Jitin Prasad injured in road accident head injury
अपघातानंतर केंद्रीय मंत्री नुकसान झालेले वाहन घटनास्थळी सोडून दुसऱ्या वाहनातून रवाना झाले. माढोला-व्हिसीटी रस्त्यावरील बहरुआ गावात हा अपघात झाला. केंद्रीय मंत्र्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद पिलीभीतच्या दौऱ्यावर होते. हा त्यांचा लोकसभा मतदारसंघही आहे. त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा वेग जास्त होता. यादरम्यान समोरील खड्ड्यामुळे ताफ्याच्या पायलट कारने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे प्रसाद बसलेली गाडीही थांबली. मात्र पाठीमागून येणारी कार प्रसाद यांच्या कारला धडकली. या अपघातात जितीन यांच्या कारचे नुकसान झाले आणि स्वतः जितीन प्रसाद हेही जखमी झाले आहेत. जितीन यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
जितिन प्रसाद आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. पुरामुळे बाधित झालेल्या गावांची स्थिती पाहण्यासाठी ते जात होते. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजीव प्रताप सिंह, आमदार प्रकाश नंद आणि आमदार सुधीर गुप्ता होते. त्यांची वाहनेही ताफ्यात धावत होती. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे जलमय झाली आहेत. त्यामुळे तेथील लोक चिंतेत पडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.