गुरुवारी रात्री जम्मूच्या अरनियामध्ये पाकिस्तान रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारांच्या घटनेत “मोठी घट” झाली आहे, परंतु गोळीबाराच्या अलीकडील तुरळक घटनांवरून हे सिद्ध होते की भारत पाकिस्तानविरुद्धची सतर्कता कायम ठेवायला हवी आणि भारत ती ठेवत आहे. Union Minister Jitendra Singh said There has been a major reduction in the incidents of firing from across the border
गुरुवारी रात्री जम्मूच्या अरनियामध्ये पाकिस्तान रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) जवान आणि एक महिला जखमी झाली तर काही घरांचे नुकसान झाले. तर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) म्हणण्यानुसार, पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच होता आणि त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
सिंह यांनी सांबा येथे पत्रकारांना सांगितले की, नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये “मोठी घट” झालेली आहे.
Union Minister Jitendra Singh said There has been a major reduction in the incidents of firing from across the border
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीत नागरी संरक्षण स्वयंसेवकांना काढून टाकण्याचा प्रस्ताव मंजूर; सरकारने स्वतः एलजीकडे पाठवली होती फाइल, आता केजरीवाल सुप्रीम कोर्टात
- संयुक्त राष्ट्रात इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याचा ठराव मंजूर; बाजूने 120 मते, 14 विरोधात; भारतासह 45 देशांचे मतदान नाही
- 10 वर्षांची शिक्षा ऐकताच माफिया डॉन मुख्तार अन्सारी भर कोर्टात रडत पडला आडवा!!
- दिवसभराची तोंडी वक्तव्ये आणि त्याचा प्रत्यक्ष कृतीत परिणाम!!; वाचा नेमका काय??