• Download App
    मिलिटरी सायन्सचे प्रोफेसर केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल अखिलेश यादवांविरोधात करहलमधून मैदानात!! Union Minister for Military Science P. Singh Baghel against Akhilesh Yadav in the field from Karhal !!

    मिलिटरी सायन्सचे प्रोफेसर केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल अखिलेश यादवांविरोधात करहलमधून मैदानात!!

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याविरोधात भाजप त्यांच्या परिवारातील अपर्णा यादव यांना उतरवेल अशा राजकीय अटकळी लावण्यात आल्या होत्या. परंतु त्या सगळ्या उधळून लावत भाजपने अखिलेश यादव यांच्याविरुद्ध करहल मतदारसंघातून केंद्रीय कायदे राज्यमंत्री आणि मिलिट्री सायन्सचे प्रोफेसर एस. पी. सिंह बघेल यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.Union Minister for Military Science P. Singh Baghel against Akhilesh Yadav in the field from Karhal !!

    एस. पी. सिंह बघेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपण मिलिटरी सायन्सचे प्रोफेसर आहोत. त्यामुळे विरोधी पक्षाला चकवा देण्यात माहीर आहोत, असे सूचक वक्तव्य केले आहे. एस. पी. सिंह बघेल हे आधी समाजवादी पक्षात होते. ते माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे चीफ सिक्युरिटी ऑफिसर देखील राहिले आहेत.

    एस. पी. सिंह बघेल यांचा राजकीय ग्राफ समाजवादी पक्षातून आमदार, बहुजन समाज पक्षातून खासदार असा देखील राहिला आहे. त्यानंतर 2014 मध्ये मात्र एस. पी. सिंह बघेल यांनी भाजपशी जुळवून घेतात फिरोजाबाद मधून लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु त्यात त्यांना अपयश आले होते. 2017 मध्ये येथे भाजपच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले. 2019 मध्ये आग्रा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून येत मोदी सरकार मध्ये कायदे खात्याचे राज्यमंत्री बनले.

    आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस. पी. सिंह बघेल यांना राज्याच्या राजकारणात हायप्रोफाइल मतदारसंघातून तिकीट दिले आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्हा मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांचा राजकीय गड मानला जातो. त्याचे चिरे ढासळण्यासाठी एस. पी. सिंह बघेल यांना तेथे पाठवण्यात आले आहे. मैनपुरी जिल्ह्यातील करहलमधून ते अखिलेश यादव यांच्या विरोधात विधानसभेचे निवडणूक लढवणार आहेत. अखिलेश यादव यांना मतदारसंघांमध्ये अडकवून ठेवण्याचा भाजपचा हा राजकीय डावपेच असल्याचे राजकीय निरीक्षक मानत आहेत.

    Union Minister for Military Science P. Singh Baghel against Akhilesh Yadav in the field from Karhal !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य