वृत्तसंस्था
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ऑफर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल अर्थात जेडीयुचे अध्यक्ष लल्लनसिंग यांनी देखील तसे राजकीय संकेत दिले आहेत. Union Minister Ashwini Kumar Choubey’s to nitish kumar
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी मात्र नितीश कुमार यांच्यावर जोरदार शरसंधान साधले आहे. नितीश कुमार यांनी गेल्या 17 वर्षात एकही निवडणूक थेट जनतेतून लढवलेली नाही. त्यांनी आधी विधानसभेची एखादी निवडणूक जनतेतून लढवून दाखवावी. केंद्र सरकार त्यांना बक्षीस देईल, असा टोला अश्विनी चौबे यांनी लगावला आहे.
त्याचबरोबर नितीश कुमार काय फुलपूर मधून लढणार!!, त्यांना तिथली जनता “फुल” बनवेल. त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, अशा टोल्याची भर देखील चौबे यांनी आपल्या वक्तव्यात घातली.
नितीश कुमार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बिहार बाहेर पडून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दिले आहेत. अखिलेश यादव यांचे देखील त्यांना निमंत्रण आहे. या पार्श्वभूमीवर अश्विनी कुमार चौबे यांनी पाटण्यात जाऊन नितीश कुमार यांच्या संभाव्य राजकीय खेळीची खिल्ली उडवली आहे.
Union Minister Ashwini Kumar Choubey’s to nitish kumar
महत्वाच्या बातम्या
- ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी : 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांत 608 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
- चंदीगड विद्यापीठातील धक्कादायक प्रकार : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
- पुढच्या मराठवाडा मुक्तिदिनापूर्वी दौलताबाद किल्ल्याचे नाव ‘देवगिरी’ करणार , पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा
- नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी अर्थात राष्ट्रीय रसद नीती जाहीर!; तिचे महत्त्व काय?