‘’हे दोघेही राजस्थानमध्ये सत्तेसाठी लढत आहेत, मात्र सरकार तर भाजपाचं येणार आहे.’’, असा टोलाही लगावला आहे.
विशेष प्रतिनिधी
जयपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी राजस्थानमधील भरतपूर येथे बुथ अध्यक्षांच्या संकल्प परिषदेला संबोधित करताना गेहलोत सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘’सचिन पायलट तुमचा नंबर येणार नाही, जमिनीवर तुमचे योगदान जास्त असेल, पण काँग्रेसच्या तिजोरीत गेहलोत यांचे योगदान तुमच्यापेक्षा जास्त आहे.’’ असे अमित शाह म्हणाले. Union minister Amit Shah takes a dig at Ashok Gehlot-Sachin Pilot tussle in Rajasthan Congress
याशिवाय हे दोघेही राजस्थानमध्ये सत्तेसाठी लढत असल्याची टीका शाह यांनी केली. ‘’गेहलोत म्हणत आहेत की मला खाली उतरायचे नाही आणि पायलट म्हणत आहेत की मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. मात्र हे दोघेही उगाचच भांडत आहेत, कारण सरकार तर भाजपाचं येणार आहे.’’
अमित शाह म्हणाले की, आज येथे ४ जिल्हे आणि १९ विधानसभांमधील २४ हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. एकेकाळी काँग्रेसचे नेते संसदेत ‘हम दो-हमारे दो’ म्हणत आम्हाला टोमणे मारायचे, कारण आमचे दोनच खासदार होते, पण आज त्याच काँग्रेस पक्षाला लोकसभेत विरोधी पक्षनेत्याचा दर्जाही मिळत नाही.
याचबरोबर, ‘’आमच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेहनत आणि शौर्याच्या जोरावर भाजपाला हे यश आणि विस्तार मिळाला आहे. नेत्यांच्या जोरावर दुसरा कोणताही पक्ष चालू शकतो, पण जेव्हा आमचा पक्ष विजय मिळवतो तेव्हा तो बूथवर उभ्या असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांचा विजय असतो.’’, असेही यावेळी शाह म्हणाले.
Union minister Amit Shah takes a dig at Ashok Gehlot Sachin Pilot tussle in Rajasthan Congress
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट
- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट
- Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी
- गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!