• Download App
    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणो|Union Home Minister Amit Shah should resign, Congress spokesperson Sachin Sawant demanded

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणो

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पुरावे नसल्याचा अहवाल सीबीआयच्या तपासाधिकाऱ्यांनी देऊनही त्यांच्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात आला.Union Home Minister Amit Shah should resign, Congress spokesperson Sachin Sawant demanded

    या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. कोणाच्या इशाऱ्यावरून एफआयआर नोंदविण्यात आला, असा सवाल केला आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.



    बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये बार, हॉटेलमालकांकडून गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. त्याबाबत उच्च न्यायालयाने प्राथमिक चौकशी करण्यास सांगितले होते.

    तेव्हा देशमुख व वाझे या दोघांची भेट झाल्याचे व गृहमंत्र्यांनी तसे सांगितल्याचे पुरावे नसल्याचा व चौकशी बंद करण्याचा अहवाल दिला होता. मात्र कोणाच्या इशाऱ्यावरून एफआयआर नोंदविण्यात आला, असा सवाल सावंत यांनी केला आहे.

    Union Home Minister Amit Shah should resign, Congress spokesperson Sachin Sawant demanded

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे