विरोधकांची नुकती पाटणामध्ये बैठक पार पडली, यानंतर आता भाजपाही आक्रमक होताना दिसत आहे.
विशेष प्रतिनिधी
बेगुसराय : बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या सर्वसाधारण सभेनंतर आता भाजपानेही हालचाली तीव्र केल्या आहेत. गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील बेगुसराय येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर विशेषत: नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘’आत्ताच पल्टू बाबू नितीश कुमार विचारत आहेत की, केंद्र सरकारने 9 वर्षात काय केले? नितीशबाबू, ज्यांच्यासोबत इतके वर्षे राहिलात, ज्यांच्यामुळे मुख्यमंत्री झालात, त्यांचा थोडा आदर करा.’’ Union Home Minister Amit Shah criticizes Chief Minister Nitish Kumar in Bihar
अमित शाह म्हणाले की मोदींनी या 9 वर्षात खूप काम केले आहे. मोदींचे 9 वर्षे गरीब कल्याणाची, भारताचा गौरव, भारताची सुरक्षा यांची आहेत. ते म्हणाले की, याआधी जेव्हा पाकप्रणित दहशतवाद्यांचे हल्ले झाले, तेव्हा सोनिया-मनमोहन यांच्या सरकारने उत्तर दिले नाही, दिल्लीत मौनी बाबा बनून बसायचे, पण पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात जेव्हा पुलवामा आणि उरी येथे हल्ले झाले, तेव्हा मोदींनी दहा दिवसांतच सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांना ठार केले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, ममता या सर्वांनी कलम 370ला लहान मुलाप्रमाणे स्वत: खेळवत राहिले. ते म्हणत होते कलम 370 हटवलं तर काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील, राहुलबाबा रक्ताच्या नद्या दूरच एक दगडही फेकण्याची हिंमत कोणी केली नाही.
Union Home Minister Amit Shah criticizes Chief Minister Nitish Kumar in Bihar
महत्वाच्या बातम्या
- डीके शिवकुमार यांचा CM सिद्धरामय्या यांच्या कार्यक्षमतेवरच सवाल, म्हणाले- त्यांच्या जागी मी असतो तर प्रकल्प केव्हाच झाला असता
- मुख्यमंत्री कोण? हा वाद नाही, आम्हाला दोन्ही नेत्यांचे नेतृत्व मान्य; शिवसेना मंत्री दीपक केसरकरांचा खुलासा
- ‘’निवडणुका संपताच नीट चालायला लागतील, अगोदरही…’’ ममता बॅनर्जींच्या दुखापतीवर अधीर रंजन चौधरींची खोचक टिप्पणी!
- सुप्रिया सुळे – अजित पवार समीकरण बसणे अवघड; महाराष्ट्रातला फेरबदलाचा पेपर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जातोय जड!!