वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कृषी कर्ज किसान क्रेडिट कार्डवर मिळते. ते पूर्वीप्रमाणेच 4 % दराने शेतकऱ्यांना उपलब्ध राहील.Union Cabinet Decision Loans to farmers at 4% interest under short-term agricultural loans; ECLGS will also get 50 thousand crores
आरबीआयने रेपो रेट वाढवल्यानंतर बँका आणि वित्तीय संस्थांवर व्याजदर वाढवण्यासाठी दबाव वाढला होता. यातून 1.50 टक्के व्याज काढण्यासाठी सरकार बॅंकाना मदत करेल. यासाठी सरकार 34856 कोटी रुपये देणार आहे. 2024-25 पर्यंत त्यांच्या व्याजात कोणतीही वाढ होणार नाही.
3 लाखांपर्यंतचे कर्ज 4% व्याजाने मिळत राहील
किसान क्रेडिट कार्डवर, 7 टक्के व्याजदराने शेतीसाठी कर्ज उपलब्ध आहे. परंतु वेळेवर परत आल्यावर ३ टक्के अधिक सवलत मिळते. अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी 4 टक्के व्याजाने कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
इमर्जन्सी क्रेडिट लाइन हमी योजनेसाठी मदत
इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) अंतर्गत, प्रवास, पर्यटनासह अन्य क्षेत्रांवर 50 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. याशिवाय इतर क्षेत्रांना 7 हजार 500 कोटींची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे.
Union Cabinet Decision Loans to farmers at 4% interest under short-term agricultural loans; ECLGS will also get 50 thousand crores
महत्वाच्या बातम्या
- Bhandara Flood Updates : भंडारा जिल्ह्यात ४२ निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था
- पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८, तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद
- पावसाळी अधिवेशन : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4,700 कोटींची तरतूद, 25,826 कोटींच्या पुरवणी मागण्या
- विधान परिषदेच्या सभापतीपदाची लढाई…; पण त्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी!!