सर्वसामान्य घरगुती ग्राहकांपासून ते शेतकरी आणि वाहनचालकांपर्यंत सर्वांनाच याचा फायदा होणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (६ एप्रिल) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात दिलासा देण्यात आला आहे. पीएनजीवर सुमारे १० टक्के कपात होईल आणि सीएनजीवरही ५ ते ६ रुपयांची प्रतिकिलोमागे कपात होईल. याचबरोबर मंत्रिमंडळाने सुधारित घरगुती गॅस किंमतीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली आहे. Union Cabinet approves revised domestic gas pricing guidelines
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने गॅसच्या किमतीच्या नवीन फॉर्म्युलाला मंजुरी दिली आहे. सीएनजी आणि पाईप स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींवर कमाल मर्यादा निश्चित केली आहे.
घरगुती गॅसची किंमत आता आंतरराष्ट्रीय हब गॅसऐवजी आयात केलेल्या क्रूडशी जोडली गेली आहे आणि आता घरगुती गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या टक्के असेल. दर महिन्याला यावर निर्णय घेतला जाईल. सर्वसामान्य घरगुती ग्राहकांपासून ते शेतकरी आणि वाहनचालकांपर्यंत सर्वांनाच याचा फायदा होणार आहे.
Union Cabinet approves revised domestic gas pricing guidelines
महत्वाच्या बातम्या
- आंतरधर्मीय विवाहावरून नंदुरबारमध्ये मध्यरात्री हिंसक संघर्ष; दगड-विटांचा मारा, पोलिस जखमी
- कर्नाटकच्या मंत्र्याला अल्पसंख्याकांविरोधात द्वेषपूर्ण भाषण करणे महागात, निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई
- PM मोदींनी मी चूक असल्याचे सिद्ध केले, भाजप सरकार पुरस्कार देईल असे वाटलेही नव्हते, पद्मश्री मिळाल्यानंतर शाह रशीद अहमद कादरी भावुक
- सुप्रीम कोर्ट : ईडी – सीबीआय तपासात पुढाऱ्यांना जन सामान्यांचाच न्याय; विरोधकांच्या “ऑक्सिजन” नळीवर पाय!!