• Download App
    Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhanशेतकरी विरोधी असणे काँग्रेसच्या DNA

    Shivraj Singh Chouhan : ”शेतकरी विरोधी असणे काँग्रेसच्या DNAमध्ये आहे”

    Shivraj Singh Chouhan

    केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी साधला निशाणा!


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan ) यांनी काँग्रेस पक्षावर मोठा आरोप करत शेतकरी विरोधी असणे काँग्रेसच्या डीएनएमध्ये असल्याचे म्हटले आहे. केंद्रातील मोदी सरकार कृषी क्षेत्राच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेस पक्षालाच शेतकरी विरोधी म्हटले.



    शुक्रवारी राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान शिवराज सिंह चौहान म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत कृषी क्षेत्राच्या बजेटमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. शेतकऱ्यांना अनुदानावर खते मिळत आहेत आणि भविष्यातही मिळत राहतील. शेतकरी विरोधी असणे हे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे, असे कृषिमंत्री म्हणाले.

    काँग्रेसचे प्राधान्यक्रम सुरुवातीपासूनच गडबडले आहेत. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, केंद्रातील विद्यमान सरकारने कृषी क्षेत्रासाठी काही प्राधान्यक्रम ठरवले आहेत, ज्यामध्ये पीक उत्पादन वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे, शेतकऱ्यांना पिकांना चांगला भाव देणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना पुरेसा दिलासा देणे यांचा समावेश आहे सहभागी आहे.

    केंद्र सरकार विरोधकांच्या चांगल्या सूचनांचे स्वागत करेल, असेही मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री म्हणाले. चौहान म्हणाले की, त्यांचे सरकार शेतकऱ्यांना देव मानते, वोट बँक नाही. शेतकऱ्यांना पुरेसा एमएसपी न दिल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. राज्यसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी आरोप केला की केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही आणि नुकताच आलेला अर्थसंकल्पही अपेक्षेप्रमाणे नाही.

    Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!