• Download App
    उत्तराखंडमध्ये यावर्षीच लागू होणार समान नागरी संहिता, मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा! Uniform Civil Code will be implemented in Uttarakhand this year Chief Minister Dhamis big announcement

    उत्तराखंडमध्ये यावर्षीच लागू होणार समान नागरी संहिता, मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा!

    ”2022 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही जनतेला वचन दिले होते की… ”असंही धामी यांनी सांगितलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली  : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी गुरुवारी भारत24 च्या ‘व्हिजन ऑफ न्यू उत्तराखंड’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्याशी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पण जेव्हा समान नागरी संहितेचा विषय आला तेव्हा त्यांनी बरीच माहिती दिली.  धामी म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 2023 पर्यंत संपूर्ण राज्यात UCC लागू केली जाईल. Uniform Civil Code will be implemented in Uttarakhand this year Chief Minister Dhamis big announcement

    पुष्कर सिंह धामी यांनी  सांगितले की, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही जनतेला वचन दिले होते की नवीन सरकार स्थापन होताच आम्ही यूसीसी आणण्याची प्रक्रिया सुरू करू आणि आम्ही तेच केले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच आम्ही यूसीसी स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन केली.

    धामी म्हणाले की, समितीला आतापर्यंत एक वर्ष चार महिने लागले आहेत. सुमारे 2 लाख 35 हजार लोकांशी संवाद साधला. लोकांकडून सूचनाही घेण्यात आल्या आहेत. सामाजिक, धार्मिक संघटनांनीही विविध सूचना पाठवल्या आहेत. समितीने त्याचा मसुदा जवळपास तयार केला आहे. तसा मसुदा आमच्याकडे सुपूर्द केला जाईल. संविधानिक प्रक्रियेअंतर्गत त्याची अंमलबजावणी केली जाईल.

    Uniform Civil Code will be implemented in Uttarakhand this year Chief Minister Dhamis big announcement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    UPI Payments : UPI पेमेंटसाठी चेहरा आणि फिंगरप्रिंटचा वापर; नवीन फीचर्सला सरकारची मान्यता

    Himachal Bus Tragedy : हिमाचलमध्ये बसवर डोंगरावरून ढिगारा कोसळला; 15 जणांचा मृत्यू, 2 मुलांना वाचवले

    MUDA Scam : MUDA घोटाळ्यात ईडीने 34 मालमत्ता जप्त केल्या; माजी आयुक्तांवर 31 साइट देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप