• Download App
    नोकरी मिळविण्यासाठी पंतप्रधानांच्या स्विय सहाय्यकांचा पीए असल्याची बतावणी, न्यूज चॅनलच्या पत्रकाराने रचले कुंभाड|Unhappy with salary cut, news channel employee poses as PA to PM Modi’s secretary to get new job

    नोकरी मिळविण्यासाठी पंतप्रधानांच्या स्विय सहाय्यकांचा पीए असल्याची बतावणी, न्यूज चॅनलच्या पत्रकाराने रचले कुंभाड

    विशेष प्रतिनिधी

    नोएडा: कोरोना महामारीमुळे पगार कमी झाल्याने दुसऱ्या न्यूज चॅनलमध्ये नोकरी मिळविण्यासाठी एका पत्रकाराने चक्क पतंप्रधानांच्या स्विय सहाय्यकांचा पीए असल्याची बतावणी केली. चॅनलमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्याचा भांडाफोड झाला.Unhappy with salary cut, news channel employee poses as PA to PM Modi’s secretary to get new job

    भारत वर्मा असे या पत्रकाराचे नाव आहे. तो एका स्थानिक न्यूज चॅनलमध्ये काम करतो. कोरोनाच्या काळात पगार कमी झाल्याने त्याला दुसरी नोकरी हवी होती. त्यामुळे त्याने पंतप्रधानांच्या स्विय सहाय्यकांचा पीए बोलत असल्याची बतावणी एका न्यूज चॅनलच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयाकडे (सीईओ) केली. त्याच्याशी ई-मेलवरून संपर्क साधून आपले नाव अभिजित असल्याचे सांगितले.



    पंतप्रधानांच्या स्विय सहाय्यकांचे पीए बोलू इच्छितात असे त्याने सीईओला सांगितले. दुसऱ्या दिवशी स्वत:ला पंतप्रधानांचा स्विय सहाय्यक म्हणविणाऱ्याचा फोन या सीईओना आला. त्याने सांगितले की भारत वर्मा नावाच्या पत्रकाराला तुमच्या न्यूज चॅनलमध्ये काम करण्याची संधी द्यावी. त्याचा बायोडाटाही पाठवित असल्याचे सांतिले. खरोखरच वर्मा याचा बायोडाटा व्हॉटसअ‍ॅपवर पाठविलाही.

    सीईओंनी वर्मा याला मुलाखतीसाठी कार्यालयात बोलावले. तो आल्यावर चॅनलमधील इतर सहकाºयांना संशय आला. तेव्हा त्याने हे कुंभाड रचल्याचे उघड झाले. त्यानंतर न्यूज चॅनलच्या सीईओंनी पोलीसांत तक्रार दाखल केली.

    नोएडाचे पोलीसांनी भारत वर्मा याला अटक केली आहे. पोलीस उपायुक्त राजेश एस यांनी सांगितले की भारत वर्मा याचे ट्विटर हॅँडलर आणि व्हॉटसअ‍ॅप तपासण्यात आले आहे. एका छोट्या माध्यमसमुहात तो काम करत होता. कोरानामुळे त्याचा पगारही कमी झाला होता. त्यामुळे मोठ्या ब्रॅँडमध्ये नोकरी मिळविण्यासाठी त्याने सर्व कुंभाड रचले. पंतप्रधानांच्या स्विय सहाय्यकाचा वशिला वापरल्यास आपल्याला नोकरी लवकर मिळेल, असे त्याला वाटले.

    Unhappy with salary cut, news channel employee poses as PA to PM Modi’s secretary to get new job

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य