G20 च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी लवकरच भारतात येणार असल्याचेही सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाची लोकप्रियता खूप जास्त आहे. तसेच परदेशी राजकारणी आणि उच्चपदस्थ अधिकारीही या कार्यक्रमाचे चाहते आहेत. युनेस्कोच्या डीजी ऑड्रे अझौले यांनीही पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. मन की बात कार्यक्रमाच्या 100 व्या भागातही त्यांनी आपले मत व्यक्त केले. UNESCOs DG Audrey Azoulay also praised the Mann Ki Baat programme told PM Modi
‘भारत आणि युनेस्को’मधील संबंध दृढ –
‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान, UNESCOच्या DG ऑड्रे अझौले यांनी म्हटले, ‘नमस्ते पंतप्रधान मोदी, UNESCO च्या वतीने, मला मन की बात रेडिओ कार्यक्रमावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानते. युनेस्को आणि भारत यांचा मोठा इतिहास आहे आणि शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती या सर्व क्षेत्रात आपले संबंध खूप मजबूत आहेत. आज या निमित्ताने मला शिक्षणाचे महत्त्व सांगायचे आहे. २०३०पर्यंत सर्व सदस्य देशांनी प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळेल याची खात्री करावी, असा युनेस्कोचा प्रयत्न आहे.
युनेस्कोच्या डीजींनी पंतप्रधान मोदींना हेही विचारले की, ‘ शिक्षणाच्या दृष्टीने तुमचे सरकार या दिशेने काय करत आहे, जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या देशात प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण कसे मिळेल? तर, संस्कृती आणि परंपरांचे समर्थन आणि जतन कसे करता येईल, या दिशेने युनेस्कोही काम करत आहे. भारत G20चे अध्यक्षपद भूषवत आहे, अशा परिस्थितीत भारत आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात संस्कृती आणि शिक्षणाला प्राधान्य देत आहे. तसेच, UNESCO DG ने सांगितले की, G20 च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी त्या लवकरच भारतात येणार आहेत.
UNESCOs DG Audrey Azoulay also praised the Mann Ki Baat programme told PM Modi
महत्वाच्या बातम्या
- Watch : PM मोदींच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागाची कशी झाली तयारी? पाहा पडद्यामागील काही अद्भुत क्षण…
- ‘Mann Ki Baat @ 100’ : बिल गेट्स यांनी “मन की बात”च्या शतकाबद्दल पंतप्रधान मोदींना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
- मन की बात @100 : मुंबईत भाजपचे 5000 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन
- भाजपचे टॉप बॉसेस कर्नाटकच्या रणमैदानात व्यग्र; विरोधकांचे बॉसेस कुस्तीगीर आंदोलनाला चिथावणी देण्यात व्यस्त!!