विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेतील काही विद्यापीठे आणि भारतातील वेचक निवडक लिबरल्स यांनी आयोजित केलेल्या Dismantaling Global Hindutva या हिंदुत्व व्देष्ट्यांच्या परिषदेला बौध्दिक काटशह देण्यासाठी Understanding Hindutva and Hindufobia शैक्षणिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. ब्रिटनस्थित India Knowledge Consortium या संस्थेने ही परिषद आयोदजित केली आहे.
प्रख्यात इतिहासकार आणि सावरकरांचे बेस्ट सेलर चरित्रकार डॉ. विक्रम संपत, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक, विचारवंत मकरंद परांजपे आणि भारतीय इतिहास आणि धर्म या विषयातल्या तज्ञ अभ्यासिका प्रो. लावण्या वेमसानी हे Understanding Hindutva and Hindufobia या शैक्षणिक परिषदेतले मुख्य वक्ते आहेत. understanding hindutv and hindufoboia acadamic conference in uk on 4, 5, 6 sept 2021
हिंदुत्वाच्या परिभाषेपासून ते जागतिक पातळीवर हिंदुत्वाचा व्देष का फैलावतोय या विषयावर हे तज्ञ आपले विचार व्यक्त करतील. विक्रम संपत यांचा भर हिंदुत्वाच्या परिभाषेवर असेल, तर मकरंद परांजपे आणि लावण्या वेमसानी यांचा भर जागतिक पातळीवरच्या हिंदुत्व व्देषाची कारणमीमांसा करण्यावर असेल. ४, ५ आणि ६ सप्टेंबरला हे विचारवंत अनुक्रमे आपले विचार मांडतील. या शैक्षणिक परिषदेत सहभागी होण्यासाठी understandinghindutvaandhindufoboia.eventbrite.co.uk या वेबसाइटवर रजिस्टर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
understanding hindutv and hindufoboia acadamic conference in uk on 4, 5, 6 sept 2021
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानात ऐन जन्माष्टमीदिवशीच श्रीकृष्णाच्या मंदिरावर हल्ला; भाविकांना बेदम मारहाण
- जम्मू -काश्मीर : सदरा बाग वनक्षेत्रात सीआरपीएफने अनेक शस्त्रांसह ग्रेनेड जप्त
- नोएडातील दोन चाळीस मजली टॉवर पाडण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, नियमबाह्य बांधकाम करणाऱ्या सुपरटेकला तडाखा
- शरण या किंवा मरायला तयार व्हा, तालिबानने अनेकांच्या घरांच्या दारावर लावली धमकी देणारी पत्रे
- पुरीतील विमानतळाला शंकराचार्यांनी केला विरोध, परिणामांना तयार राहण्याचा सरकारला इशारा