• Download App
    अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात, भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार!Under the leadership of PM Modi India became the fifth largest exporter in the world

    अभिमानास्पद! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात, भारत बनला जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार!

    वर्षभरापूर्वी भारत नवव्या क्रमांकावर होता.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षम आणि सक्षम नेतृत्वाखाली भारत प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. या आर्थिक वर्षात ७५० बिलियन डालर्सची निर्यात करून भारत जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे, तर वर्षभरापूर्वी भारत नवव्या क्रमांकावर होता. Under the leadership of PM Modi India became the fifth largest exporter in the world


    पंतप्रधान मोदींची नवीन संसद भवनाला अचानक भेट, बांधकाम कामगारांशी केली चर्चा


    मोदी सरकारच्या यशस्वी धोरणांचा परिणाम असा आहे की, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असताना, सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांना न जुमानता, भारत आर्थिक आघाडीवर सातत्याने मोठी कामगिरी करत आहे. ०२  सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. आता फक्त चार देश भारताच्या पुढे आहेत. ते म्हणजे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी. त्याचप्रमाणे आता आणखी एक विक्रम भारताच्या नावावर झाला आहे.

    या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी देशवासियांचे केले  अभिनंदन –

    भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात ७५० अब्ज डॉलरहून अधिक निर्यात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लोकांचे कौतुक केले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले ट्विट शेअर करून, पंतप्रधानांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात ७५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात साध्य करण्याच्या यशाबद्दल माहिती दिली. पंतप्रधानांनी ट्विट केले: “या कामगिरीबद्दल भारतातील नागरिकांचे अभिनंदन. हीच भावना भारताला आगामी काळात स्वावलंबी बनवेल.’’

    भारत जगातील  पाचवा सर्वात मोठा निर्यातदार बनला –

    या आर्थिक वर्षात, भारत ७५० अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू आणि सेवांची निर्यात करत जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. गेल्या वर्षी २०२१-२२ मध्ये भारताने ६०० अब्ज डॉलरची निर्यात केली होती आणि त्यामुळे तो नवव्या क्रमांकावर होता. करोनानंतरचे जागतिक संकट, रशिया-युक्रेन संघर्षात जागतिक मंदी, चढे व्याजदर, ऊर्जा संकट, उत्पादन बंद या सर्व परिस्थितीचा विचार करता भारताचे हे यश नेत्रदीपक आहे.

    Under the leadership of PM Modi India became the fifth largest exporter in the world

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य